शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

मुंबईकर पालक म्हणतात, आता ऑनलाइन शाळा नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 06:41 IST

School Reopen : १ लाख १० हजार १९३ पालकांनी सर्वेक्षणात नोंदवली मते

ठळक मुद्दे१ लाख १० हजार १९३ पालकांनी सर्वेक्षणात नोंदवली मते

मुंबई : जवळपास दीड वर्ष घरातून ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर पालकांना मुलांच्या शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची उत्सुकता आहे. एससीईआरटीच्या सर्वेक्षणात तब्बल ८१ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवायची तयारी दाखवली आहे. त्यात मुंबई विभागातील एकूण १ लाख १० हजार १९३ पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. यामध्ये पालिका विभागातील ७० हजार ८४२ तर मुंबई उपसंचालक विभागातील ३९ हजार ३५१ पालकांचा सहभाग आहे.

मुंबई विभागही अनलॉक होत असला, तरी अद्याप पालिका विभागाकडून असलेले कडक निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेले नाहीत. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्याने मुंबईतील पालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भातील हा प्रतिसाद अनाकलनीय असल्याच्या प्रतिक्रिया काही शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, किमान आठवड्यातून एक दिवसाआड तरी ४ ते ५ तासांचे वर्ग भरविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.

पालकांना मुलांमध्ये जाणवत असलेले बदल

  • आळशीपणात आणि वजनात वाढ
  • दैनंदिन सवयींच्या वेळा बदलल्या
  • कानाच्या, डोळ्यांच्या तक्रारींत वाढ
  • डोकेदुखीची समस्या जाणवते
  • पाठदुखीच्या त्रासाने हैराण
  • चिडचिडेपणा, चंचलत, एकलकोंडेपणा वाढला
  • विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, एकाग्रता, समाधान कमी झाले

म्हणून शाळा सुरू व्हाव्यात

नववी-दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास कठीण जात आहे. दहावीच्या अभ्यासासाठी संकल्पना स्पष्ट होणे, त्यांचा अभ्यासात प्रत्यक्षात वापर कसा करतात, हे समजणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणातून ही उद्दिष्टे साध्य होताना दिसत नाहीत. शाळांनी जबाबदारी घेऊन किमान शिक्षक शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे विद्यार्थी आवश्यकता भासेल तेव्हा त्यांच्याकडे येऊ शकतात.सुवर्ण कळंबे, पालक

निश्चित अभ्यासक्रम, साचेबद्ध अभ्यास होत नसल्याने मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत. शिक्षकांचे लसीकरण करून, शाळांची स्वच्छता करून काही तासांचीच शाळा भरविणे हा उपाय ठरू शकतो. शाळा सुरु केल्या तरी उपस्थिती ऐच्छिक ठेवावी.मनीषा शिंदे, पालक

शाळा सुरू करण्यात अडचणी फारशाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाच तर त्यापूर्वी शाळांना त्यांनी वेतनेतर अनुदान द्यावे. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षक, विद्यार्थ्यांचे लसीकरण, ऑक्सिमीटर, थर्मामीटर सारख्या सुविधांची सोय याची जबाबदारीही सरकारने घ्यावी.पांडुरंग केंगार, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार असले तरी अद्याप त्यांच्या आणि आमच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे. शाळा सुरू करायच्या असतील तर सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने आणि पूर्ण होणे आवश्यक आहे.निरंजन पाटील, शिक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईGovernmentसरकारSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी