शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Online Education: ऑनलाइन शिक्षणामुळं ५५ टक्के विद्यार्थ्यांना करावा लागतोय गंभीर आजाराचा सामना; सर्वेक्षणातून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:42 AM

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे जे परिणाम झाले त्याचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला

ठळक मुद्देऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या ५५ टक्के विद्यार्थ्यांना जडला निद्रानाश, दृष्टिदोषसुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना तणाव तर २२ टक्के विद्यार्थ्यांना निद्रानाशाचा त्रास सुरू झाला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अधिकचा मोकळा वेळ मिळत असल्याचे काही मुलांनी सांगितले

लखनऊ : कोरोना साथीच्या काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइनशिक्षण घेत असलेल्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले आहे. त्यांना निद्रानाश, दृष्टीदोष व तणाव या आजारांचा सामना करावा लागत आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचे जे परिणाम झाले त्याचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला. त्यामध्ये ४,४५४ जण सहभागी झाले. त्यात ३,३०० विद्यार्थी, १००० पालक व १५४ शिक्षकांचा समावेश होता. ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे याबद्दल या सर्वांची मते जाणून घेण्यात आली.५४ ते ५८ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, ऑनलाइन शिक्षण घेताना त्यांना दृष्टीदोष, पाठदुखी, डोकेदुखी अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय सतत एकाच जागी बसल्यामुळे स्थूलपणा, सुस्ती, चिडचिड, थकवा या गोष्टीही वाढीस लागल्या आहेत.

सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना तणाव तर २२ टक्के विद्यार्थ्यांना निद्रानाशाचा त्रास सुरू झाला आहे. तर ४५ ते ४७ टक्के जणांना शिक्षकांशी व सहाध्यायींशी संवाद साधण्यात अडचण येत आहे. वर्गातील सर्व मुले स्क्रीनवर दिसत नाहीत अशी तक्रारही काही जणांनी केली.ऑनलाइन शिक्षण घेत असताना काही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच शिकण्याची प्रेरणा कमी झाल्याचे दिसून आले आहे. शिक्षक व विद्यार्थी हे दोघेही तंत्रज्ञानस्नेही झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे अधिकचा मोकळा वेळ मिळत असल्याचे काही मुलांनी सांगितले. या फावल्या वेळात ते बागकाम करतात तसेच हस्तकला आदी गोष्टी शिकत आहेत. ६५ टक्के मुलांनी आपण मोकळा वेळ घरच्या मंडळींसमवेत घालवत असल्याचे सांगितले. 

शाळेची ओढशिक्षक, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी अधीरबहुतांश विद्यार्थी, शिक्षकांना पूर्वीसारखे शाळेत येऊन आपला दिनक्रम सुरू करायचा आहे. ऑनलाइन शिक्षणाचे काही फायदे असले तरी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिकण्यावर व शिकविण्यावर अनुक्रमे विद्यार्थी व शिक्षकांचा अधिक विश्वास आहे. त्यामुळे ते शाळेत येण्यास अधीर झाले आहेत असेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांतून दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनEducationशिक्षण