शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:12 IST

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत सरकार दरवर्षी उच्च शिक्षणावर तब्बल ५०,०७८ कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी १०,३८४ कोटी रुपये (सुमारे २०.७३ टक्के) आयआयटींसाठी राखून ठेवले आहेत. म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रत्येक पाच रुपयांपैकी एक रुपया या संस्थांसाठी! पण या ‘प्रीमियर’ संस्थांमधून तयार झालेले टॉप इंजिनिअर देशाच्या विकासासाठी नव्हे, तर परदेशातील कंपन्यांसाठी काम करतात.

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात.

भारतात बॉन्ड मॉडेल वापरता येईलभारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी काही राज्यांनी आधीच ‘बॉन्ड मॉडेल’ लागू केले आहे. या धर्तीवर आयआयटींसाठीही अशी प्रणाली लागू करता येईल, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

चीन-सिंगापूरकडून शिकण्याची वेळचीनने ‘थाऊजंड टॅलेंट प्लॅन’सारखे २०० कार्यक्रम राबवून परदेशी गेलेल्या तरुणांना परत आणण्यात मोठे यश मिळवले. परतणाऱ्या तज्ज्ञांना ६० लाख ते ३.७५ कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार, कर सवलती, उच्च पगार व स्टार्टअप निधी दिला जातो. २०२३ मध्ये एक लाखांहून अधिक युवा चीनमध्ये परतले.सिंगापूरने १९९० पासून विद्यार्थ्यांना सरकारी मदतीच्या बदल्यात ३ ते ६ वर्षे देशात कामाची बंधनकारक अट ठेवली आहे. 

वार्षिक ७.६९ लाख खर्चसध्या देशात २३ आयआयटींमध्ये सुमारे १.३५ लाख विद्यार्थी शिकत आहेत. एका विद्यार्थ्यावर सरकारचा वार्षिक खर्च सुमारे ७.६९ लाख रुपये आहे. १० वर्षांपूर्वी ही  त्यावेळी प्रतिविद्यार्थी खर्च सुमारे पाच लाखांच्या आसपास होता.

‘नेटवर्क’मुळे सोपे होते जाणेसंशोधनानुसार, आयआयटी विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यामागे माजी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे एक मजबूत ‘नेटवर्क’ कार्यरत आहे. हे नेटवर्क विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठे व कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : IIT Graduates Prefer Foreign Jobs Despite Heavy Government Investment.

Web Summary : Despite significant government investment in IITs, a majority of top graduates pursue opportunities abroad. Experts suggest bond models, learning from China and Singapore, to retain talent within India. Strong alumni networks facilitate overseas placements, impacting national development.
टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई