शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

By किरण अग्रवाल | Published: October 07, 2021 5:38 PM

Addiction of Social Media : म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे.

- किरण अग्रवाल काळाच्या ओघात जीवनमान बदलले तशा गरजा बदलल्या व त्या अनुषंगाने साधन सुविधाही उपलब्ध झाल्या. ही साधने व सुविधा जीवन सुसह्य करण्यासाठीच असल्याने त्यावरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत जाणे स्वाभाविकच होते, परंतु त्याखेरीज आपण त्याच्या आहारी जाऊ लागल्याने ते सारे गरजेचे व सवयीचे होत गेले. अशी सवय जेव्हा अतिरेकाची पातळी गाठते तेव्हा ती व्यसनाधीनता म्हणवते. संपर्क सुविधेचे साधन म्हणून आलेल्या मोबाईलचा वापर व त्यावरील सोशल मीडियाची हाताळणी हीदेखील आजच्या आधुनिक काळातील व्यसनाधीनताच बनली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. 

व्यसन म्हटले की प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात त्या विडी, सिगारेट, तंबाखू, मद्य आदि बाबी; अलीकडे त्यात गुटक्याचीही भर पडली आहे. आता या यादीत मोबाईलचाही समावेश करता येणार आहे, कारण साधन म्हणून तातडीच्या व सुलभ संपर्कासाठी मोबाईलचा वापर गरजेचा बनला असला तरी त्यावरील सोशल मीडियाच्या नादात विशेषता तरुणवर्ग इतका नादावला आहे की त्यातून त्याची स्वमग्नता ओढवते आहे. म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी व त्यातून नाते संबंध दृढ करण्याऐवजी चॅटिंगच्या माध्यमातून संबंध टीकवण्याकडे कल वाढला आहे. दसरा, दिवाळीला घरोघरी जाऊन होणाऱ्या स्नेहाच्या भेटी आता व्हाट्सअपवर संदेशांचे आदान-प्रदान करून होतात. दुःखद प्रसंगी रडक्या ईमोजीने काम भागू लागले आहे. स्नेह टिकतोय, पण ओलावा ओसरतोय; असेच याबाबत म्हणता यावे. 

महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलचा वापर करताना त्यावरील व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियावर रमण्याचे वा त्यातच गुंतून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या गोष्टीचे व्यसन जडावे तसा हा प्रकार झाला आहे. अलीकडेच व्हाट्सअप, फेसबुक 5/6 तासांसाठी बंद पडल्यावर अनेक जणांना जो अस्वस्थतेचा अनुभव आला त्यातून यासंबंधीची व्यसनाधीनता अधोरेखित होऊन गेली. घराघरात टीव्हीसमोर बसून राहणाऱ्या व मोबाईलमध्ये डोके घालून बसणाऱ्या लहान मुलांना पालकांकडून दटावले जाते, परंतु मोबाईलवरील सोशल मीडियात गुंतून पडलेल्या पालकांचा कान धरणार कोण असा प्रश्न आहे. कामाचा अगर उपयोगीतेचा भाग म्हणूनच नव्हे, तर  बिनकामानेही, टाईमपास म्हणून ही माध्यमे हाताळणे अनेकांना इतके अंगवळणी पडून गेले आहे, की ते सुरू नसले की चुकचुकल्यासारखे होते. हे जे सवयीचे होऊन गेले आहे ती सवयीची गुलामगिरी घातक आहे, हा यातील चिंतेचा विषय आहे. सोशल मीडियाच्या हाताळणीची आधुनिक व्यसनाधीनता यातून पुढे आली असून, पारंपरिकतेखेरीजची ही नवी व्यसनमुक्ती साधणे आता गरजेचे होऊन गेले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप