शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काकाऽऽ  आम्हाला वाचवा !

By सचिन जवळकोटे | Updated: September 22, 2019 09:07 IST

लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

वडाळ्याच्या ‘काकां’चं भाग्य खुललं बुवाऽऽ वयाच्या ७८ व्या वर्षी का होईना ‘घड्याळ’वाल्यांनी अवघा जिल्हा सांभाळायला दिलाय त्यांना. खरंच, सलाम करायला हवं ‘थोरले काका बारामतीकर’ यांना. स्टेजवर भाषा होती नव्या रक्ताची, तरुण नेतृत्वाची...स्टेजवरून खाली उतरल्यावर निवड झाली बुजुर्ग नेत्याची. ‘बारामतीकरां’च्या रॅलीत ‘नव्या नेतृत्वाला वाव द्याऽऽ’ असा टाहो सोलापूरच्या तरुणाईनं फोडला तरीही ‘बॅलन्स’ साधण्याच्या राजकारणात ही घोषणा पुरती विरली हवेत. केवळ ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांचं एकट्याचं वर्चस्व नको म्हणून ‘थोरल्या काकां’नी नेहमीप्रमाणं चोखाळली धक्कादायक निर्णयाची वाट.

किर्तनकार ‘काका वडाळाकर’ महाराज !

‘घड्याळ’वाल्यांची यात्रा गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी पंढरपुरात आलेली, तेव्हा ‘दीपकआबां’ची बॉडी लँग्वेज सांगलीच्या ‘जयवंतरावां’नी बरोबर ओळखलेली. ‘आपल्यातले काहीजण जायच्या तयारीतऽऽ’ असं त्यांनी रोखून बघत सांगताच ‘दीपकआबां’चा चेहरा घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे गर्रऽऽकन् बदललेला. त्याच रात्री ‘जयवंतरावां’चा मेसेज ‘बारामती’ला गेला, ‘साहेबऽऽ सोलापूरच्या ठाणेदारानंही कलटी मारलीय !’...आता ‘अकलूज-बार्शी’च्या सेनापतीसारखे कैक रथी-महारथीच जिथं ‘खंजिरा’ला धार लावण्यात मग्न होते, तिथं सांगोल्याच्या ठाणेदाराची चिंता काय म्हणुनी बारामतीकरांनी करावी ? अखेर काही दिवसांनी या ‘आबां’नी चाकू परजला.

  ...मात्र याच काळात ‘नरखेड’च्या ‘पाटला’नं थेट बारामतीच्या ‘धाकट्या दादां’शी कॉन्टॅक्ट केलेला. ‘यापुढं जिल्ह्याचा ठाणेदार पाटलांचा उमेशच असेल !’ असा लेखी नियुक्तीचा खलिताही तयार झाला; मात्र याची कुणकुण अनगरच्या वाड्याला लागली. तिघेही खडबडून जागे जाहले. भलेही ‘घड्याळ्या’चा किल्ला ढासळला. एवढे बुरूज कोसळले...तरीही उशाला सुरूंग लावून झोपण्याची ‘राजन मालकां’ची नव्हती तयारी...त्यांनी थेट ‘थोरल्या काकां’चा धावा केला. ‘म्हैस दुभती नसली तरी चालेल, पण मारकुटी नको’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मग काय.. बलाढ्य शत्रूसोबतच्या घनघोर युद्धातही नेहमीचा ‘गनिमी कावा’ आपल्याच लोकांशी रंगला. सोलापुरात जेव्हा ‘थोरल्या काकां’च्या स्वागतासाठी ‘साहेब.. तरुण नेतृत्वाला वाव द्याऽऽ’ असा फलक लावून तरणी पोरं उभारलेली (की उभी केलेली ?).. त्याचवेळी वड्याळ्यातील ‘काकां’च्या खांद्यावर जिल्ह्याची धुरा सोपविण्याचा निर्णय ठाम झालेला.

  प्रत्येक ठिकाणी ‘बॅलन्स’ साधण्यात माहीर असलेल्या ‘थोरल्या काकां’नी इथंही तोच प्रयोग केलेला. ‘वडाळाकर’ अध्यक्ष तर ‘नरखेडकर’ कार्याध्यक्ष. अशी रचना बहुधा केवळ सोलापुरातच होत असावी; कारण शहरातही ‘भारतभाऊ’ अध्यक्ष, तर ‘संतोषभाऊ’ कार्याध्यक्ष. हेही खुश अन् तेही खुश. व्वाऽऽ क्या बात है...परंतु अजून एक गंमत म्हणजे ‘बळीराम काका’ म्हणजे सरळसोट गावरान नेतृत्व. कुणाचीही मुलाहिजा न ठेवता समोरच्याला पार सरळ करणारं. त्यात पुन्हा ते खूप चांगले कीर्तनकार. गावी असताना हातात टाळ-मृदंग घेऊन त्यांनी केलेली कीर्तनं पंचक्रोशीत गाजलेली. कीर्तनकार म्हणजे समाजातल्या दोषांवर बोट ठेवून त्यावर परखडपणे भाष्य करणारा. त्यामुळे अजूनही पक्षात शिल्लक राहिलेल्या संस्थानिकी मानसिकतेला हे ‘काका वडाळाकर महाराज’ आपल्या टाळातून ताळ्यावर आणणार का ? हाच प्रश्न सोलापूरच्या तरुण कार्यकर्त्यांना पडलेला.

हाता’वर मेहंदी......तोंडावर मेकअप !

सध्या ‘मध्य’मध्ये भलतीच धांदल उडालीय होऽऽ झेडपीसमोरचं ‘हात’वाल्यांचं ‘भवन’ पुरतं सुनसान पडलंय. सारी मंडळी कुठं गायब झालेली, कुणास ठावूक. आम्ही पामरानं काही लाडक्या मेंबरांना विचारलं तेव्हा समोरून वेगळीच उत्तरं ऐकू आली. इकडं ‘फिरदोस दीदी’ सांगत होत्या, ‘दौ सौ मेंदी कोना लष्कर एरिया में.. तो अडेसो कंगना मौलाली चौक में वाट्या देखो जीऽऽ’.. तिकडं ‘चेतनभाऊ’ही म्हणे पावडरच्या हजारभर बाटल्या घेऊन या चाळीतून त्या चाळीत गरागरा फिरत होते. ‘भाऊ’सारख्या गो-यागोमट्या मेंबराला इतक्या पावडरींची गरज काय, याचं उत्तर काही मिळालं नाही. ‘परवीन दीदी’ही तेच सांगू लागल्या, ‘थोबाड कू फेशवॉशा-बिशा लगाने कु वास्ते डब्बे में आईनाबी रखेल्या है देखोऽऽ’‘मध्य’मध्ये ‘फुक्कट’ ब्युटीपार्लर वस्तूंचा एवढा मोठ्या होलसेल डिलर आला तरी कुठून याचा पत्ता शेवटपर्यंत लागलाच नाही, कारण ‘जनवात्सल्य’वर ‘ताई’ काही भेटल्याच नाहीत. फक्त त्यांच्या लाडक्या सायरा दीदी मात्र हळूच पुटपुटल्या ‘हमारे लोगा पैसा बाटते क्या नै गॅरंटी नै, ये मेकपाका डिब्बा तो लोगोंतक पौंच्या देखो फिक्सऽऽ’ लगाव बत्ती...

Big Breaking

गेल्या महिनाभरापासून ‘ब्रेकिंग न्यूज’साठी तरसलेल्या तमाम ‘अक्कलकोट’करांसाठी आजची धक्कादायक Big Breaking News. शनिवारी रात्री उशिरा ‘कमळ’वाल्यांनी दिल्लीत केलंय ‘सचिनदादां’चंच नाव फायनल...मग इतके दिवस ‘तारीख पे तारीख’ची कॅसेट लावून ‘सिद्धूअण्णां’ना उगाचंच इकडून-तिकडं फिरविण्याचा उपयोग काय झाला ? आता तो प्रश्न मुंबईत तळ ठोकून बसलेल्या ‘अण्णां’नाच परत आल्यावर विचारायला हवा. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक