शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सुशील कुमारने कुस्तीत मस्ती केली असेल तर ती जिरलीच पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:16 IST

Sushil Kumar News: चाळिशीच्या उंबरठ्यावरील सुशील कुमारचे आखाड्यातले आयुष्य संपण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर तो नव्या पिढीतल्या पहिलवांनाचा ‘गुरु’ बनू शकला असता. पण, त्याची समोर येणारी संगत पाहता ‘मसल पॉवर’चा उपयोग करण्याची खुमखुमी सुशीलकडे जास्त होती असे म्हणण्यास वाव आहे. ही खुमखुमी फोफावण्याआधीच तो खुनाच्या गुन्ह्यात अडकला.

दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियमच्या वाहनतळावर झालेल्या बेदम हाणामारीत  उगवत्या राष्ट्रीय पहिलवानाचा मृत्यू होतो... या घटनेनंतर गुणवंत पहिलवान सुशील कुमार फरार होतो. हा पहिलवान साधासुधा नव्हे. देशात आजवर कोणालाही न जमलेली कामगिरी करणारा हा पहिलवान आहे. होय, सुशीलने दोन ऑलिम्पिक पदके जिंकून आणली आहेत. त्यामुळेच खुनासारख्या हिणकस गुन्ह्याशी त्याचे नाव जोडले गेल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसणे स्वाभाविक होते. टोकियो-२०२१ ऑलिम्पिक स्पर्धेचे बिगूल वाजले असतानाच खुनाच्या आरोपात अडकल्याने सुशीलचे ‘करिअर’ कायमचे संपले आहे. नजफगडचा हा ‘हरियाणवी छोरा’ स्वत:च्या हिमतीवर, कष्टाने एकेक पायरी चढत अल्पावधीत ‘इंटरनॅशनल रेसलर’ बनला होता. एकेकाळी आशिया गाजवलेला सत्पालसिंगसारखा पहिलवानसुद्धा सुशीलची गुणवत्ता पाहून त्याच्या प्रेमात पडला आणि स्वत:ची मल्लविद्या तर त्याला दिलीच, शिवाय स्वत:ची मुलगीही त्याला दिली. सुशील हा कुस्ती मारण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ठेवणारा पहिलवान म्हणून ओळखला जात होता. पण, हा धोका पत्करतानासुद्धा त्याने बेधुंद हाराकिरी कधी केली नाही. मग आखाड्याबाहेरच्या आयुष्यातच त्याने अशी कशी काय पाठ टेकली, हा प्रश्न कुस्तीक्षेत्राला पडला आहे.

मुळात, खेळासारख्या तन-मन प्रसन्न करणाऱ्या प्रकारात गुन्हेगारीवृत्ती शिरते कुठून? खरे तर आजच्या व्यावसायिक क्रीडा जगताने निवृत्त खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा साहित्य विक्री, समालोचन, संघटनात्मक कार्य असे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. यात प्रत्येकाला गती असतेच असे नाही. अशावेळी स्वत:चा काळ ओसरल्यानंतर, निरलसपणे बाजूला होऊन ‘प्रेक्षक’ होण्याची परिपक्वता भलेभले दाखवू शकत नाहीत. मैदानात असताना मिळणारी प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमरची चमक अचानक ओसरते तेव्हा ते सहन होत नाही. अशावेळी अंगभूत दबून राहिलेली विकृती डोके वर काढण्याची भीती असते. सुशील कुमार या विकृतीचा बळी असावा.  दिल्लीतल्या ‘गँगस्टर’शी त्याचे असणारे संबंध समोर येत आहेत. हे गँगस्टर म्हणजे कोणीफार मोठे स्मगलर, देशद्रोही नाहीत. स्थानिक गुंडगिरीशी सुशील संबंध राखून होता. बहुतेक ठिकाणी हेच दिसते. आखाड्यातून बाहेर पडलेले अनेक पहिलवान कोणाच्या तरी आशीर्वादाने दमदाटीच्या उद्योगात अडकलेले असतात. जे अधिक चलाख असतात ते स्वत:च गुंडांचे नेतृत्व करू लागतात, काही ‘पुढारी’ही होतात.


चाळिशीच्या उंबरठ्यावरील सुशील कुमारचे आखाड्यातले आयुष्य संपण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर तो नव्या पिढीतल्या पहिलवांनाचा ‘गुरु’ बनू शकला असता. पण, त्याची समोर येणारी संगत पाहता ‘मसल पॉवर’चा उपयोग करण्याची खुमखुमी सुशीलकडे जास्त होती असे म्हणण्यास वाव आहे. ही खुमखुमी फोफावण्याआधीच तो खुनाच्या गुन्ह्यात अडकला. पण, हे घडण्यासाठी एका उगवत्या पहिलवानाचा बळी जावा लागला. क्रीडा आणि गुन्हेगारी हा संयोग नवा अजिबातच नाही. टायगर वुड्स (गोल्फ), माइक टायसन (बॉक्सिंग) या त्यांच्या खेळात निर्विवाद जगज्जेते असलेल्या खेळाडूंची कारकीर्द गुन्हेगारीनेच डागाळली. क्रिकेटमधल्या ‘इझी मनी’च्या मोहात अडकून हॅन्सी क्रोनिएसारखा चमकदार कर्णधार संपला. ‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून कितीतरी क्रिकेटपटू, फुटबॉलपटू मैदानातून कायमचे बाहेर फेकले गेले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या बळावर गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते की, गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच वापर करून कोणी क्रीडा क्षेत्रातील स्वत:चे स्थान मजबूत करते हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

आपल्याकडे कुस्तीतल्या अनेक मोठ्या स्पर्धांमधले ‘विजेतेपद’ कुस्ती होण्यापूर्वीच कसे निश्चित झालेले असते, पंच कसे विकले जातात याच्या अनेक ‘केसरी’ कहाण्या दबक्या आवाजात नेहमीच ऐकवल्या जातात. ‘स्टार खेळाडूं’चे, ‘पदाधिकाऱ्यां’चे बिनबोभाट मांडलिकत्व न पत्करणाऱ्यांना खेळातून कसे संपवले जाते, याची कुजबूज नाही अशा क्रीडा संघटना दुर्मीळ आहेत. क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा संघटना यात राजकारणी, उद्योगपती, धनदांडगे यांची झालेली घुसखोरी खेळातला उमेदपणा, चुरस, शारीरिक कौशल्य यांना नख लावत नाही ना हेही पाहिले पाहिजे. खेळाला आणि खेळाडूंना आश्रय देणे आणि सगळेच पंखाखाली दाबूून घेणे यातला फरक या मंडळींनीही समजून घेतला पाहिजे. सुशीलने कुस्तीत मस्ती केली असेल तर ती जिरलीच पाहिजे, शिवाय या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीवरही चर्चा झाली पाहिजे.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारWrestlingकुस्तीCrime Newsगुन्हेगारी