शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 08:38 IST

‘काँग्रेस हे सेवा दल कार्यकर्त्यांचे मोहोळ झाले पाहिजे’ असे राहुल गांधींना वाटते. पण त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे सद्य:स्थितीत मात्र जिकिरीचे असू शकते.

-हरीष गुप्ता (नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

काँग्रेस पक्षाला पुन्हा महान करण्याचे स्वप्न राहुल गांधी पाहत आहेत. त्यांना स्वप्नपूर्तीची अजिबात घाई नसून पक्षात पुन्हा चैतन्य आणण्यासाठी काही दशके काम करत राहण्याची त्यांची तयारी आहे. ‘पक्ष आपल्या विचारधारेशी पक्का असला पाहिजे’ असे त्यांना वाटते. ‘काँग्रेस हे सेवा दल कार्यकर्त्यांचे मोहोळ झाले पाहिजे’ असे म्हणताना त्यांच्यासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श आहे. 

नारायण सुब्बाराव हर्डीकर यांनी १९३० साली सेवा दलाची स्थापना केली; म्हणजे संघ सेवा दलापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. त्याचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांनीही हे पद भूषविले आहे. 

सेवा दल, युवक काँग्रेस आणि राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) यांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न राहुल यांनी प्रारंभी केला होता. परंतु, गेल्या काही वर्षांत सेवा दल मागे पडले. आता पक्षाला त्यात पुन्हा जोश भरायचा आहे. कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी तसेच निर्णय घेण्यासाठी जिल्हा काँग्रेस समित्यांना बळ दिले जाणार आहे. 

साधारणत: १९६० पर्यंत अशीच व्यवस्था होती. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडे सूत्रे गेली. ७५० च्या घरात असलेल्या जिल्हा काँग्रेस समित्या भक्कम करण्याचा विचार काँग्रेस पक्ष भले करत असेल, पण तसे करणे इतके सोपे नाही. जिल्हा समित्यांना अधिकार दिले तर काँग्रेस महासमितीचे अधिकार त्यांच्याकडे जातील. हे प्रत्यक्षात आणणे जिकिरीचे आहे. 

एकेकाळी जिल्हा काँग्रेस समित्या उमेदवारांची निवड करत आणि कोणताही राष्ट्रीय नेता त्यात हस्तक्षेप करत नसे. त्यामुळे राहुल यांचे शस्त्र उलटूही शकते... अर्थात, त्याची खरी परीक्षा पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी होईल. तोवर वाट पाहिली पाहिजे.

मायावती आणि बसपाचा मृत्युलेख

बसपा या आपल्याच पक्षाचा राजकीय मृत्युलेख मायावती लिहित असल्याने राजकीय पंडित गोंधळात पडले आहेत. मायावती स्वतःच बहुजन समाज पक्षाला सरणावर ठेवत आहेत, असे दिसते. मायावतींचे बंधू आनंद कुमार आणि पक्षाला अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. ईडीच्या प्रचंड दडपणाखाली मायावती असल्याचे सांगितले जाते. 

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अन्य केंद्र सरकारी यंत्रणाही त्यांची चौकशी करत आहेत. त्यांचे बंधू आनंद कुमार यांच्याविरुद्धचे प्रकरण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडीचे सरकार असताना २००९  साली दाखल झाले होते. तेव्हापासून गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. 

२००७ साली मायावती यांनी  स्वबळावर उत्तर प्रदेश जिंकला होता. सध्या लोकसभेत पक्षाचा एकही खासदार नाही आणि एकमेव आमदार योगी आदित्यनाथ यांच्या छत्रछायेखाली वावरत आहे.

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षाचे सुमारे ३० नेते २०१४ पासून भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचा सामना करत आहेत, असे सांगण्यात येते. पैकी बरेच जण भाजपत गेल्यामुळे त्यांच्या बाबतीत तडजोड झाली. काहींना दिलासा मिळाला, तर काही अजून न्यायालयात अडकून पडले आहेत. 

या तीसपैकी दहा काँग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार, काँग्रेसचे तीन, तेलुगू देसमचे दोन, समाजवादी पक्ष आणि आयएसआर रेड्डी काँग्रेसचे प्रत्येकी एक अशी त्यांची विभागणी आहे. परंतु, असे असले तरी केवळ आनंद कुमार यांच्याविरुद्ध ईडीची केस चालू आहे आणि मायावती मात्र दलितांची मते भाजपकडे जाताना  शांतपणे पाहत आहेत.  

काही सहकाऱ्यांना त्यांनी तडकाफडकी काढून टाकले; पण पक्ष जगवण्याचा त्यांचा विचार आहे, असे त्यातून अजिबात दिसले नाही. सभेवेळी नेते निधी गोळा करत असत, ते मायावतींनी थांबवले. नातेवाइकांना पदे नाकारली. तरीही बसपाची घसरण सुरूच आहे. मायावती यांनी सध्या राजकारणातील एक नगण्य प्यादे होणे का स्वीकारले आहे,  हे कळायला मार्ग नाही.

भाजपला शशी थरूर नकोत!

बहुचर्चित आणि वजनदार काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ‘भविष्यकालीन योजना’ थंड बस्त्यात गेल्याचे दिसते. भाजपच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी राजीव चंद्रशेखर यांची नियुक्ती झाली.  तिरुवनंतपुरम लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून थरूर यांचे भाजपमध्ये स्वागत होणार नाही, असे स्पष्ट संकेत पक्षाने या नेमणुकीतून दिले. 

राजीव चंद्रशेखर मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत निसटत्या मतफरकाने  हरले; तरी तेच पुढली निवडणूक लढवतील, असे समजते. थरूर यांची कार्यशैली भाजपचे चरित्र आणि चेहऱ्याशी जुळणारी नाही. याउलट राहुल गांधींनी अलीकडे झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात राजकीय ठरावाला अनुमोदन देण्याची संधी थरूर यांना देऊन चकित केले. एक नक्की! - केरळमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांना पक्षात कुरबुरी नको आहेत!(harish.gupta@lokmat.com)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसmayawatiमायावतीShashi Tharoorशशी थरूरPoliticsराजकारण