शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

विष, विखार, विद्वेष आणि उत्तर प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:44 IST

यापुढे पातळी आणखी घसरेल, जातीय विद्वेषाने भरलेली भाषणबाजी विषारी होत जाईल आणि निवडणूक आयोग बहुतेकदा मूग गिळून बसेल !

- कपिल सिब्बल(ज्येष्ठ विधिज्ञ, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार)

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काय काय ऐकावे लागणार आहे, हे आजवर जे घडले त्यावरून स्पष्टच दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये सगळा बिनडोक गदारोळ होता.  त्याहून बरेच काही पणाला लागलेले असताना, आता ते चित्र बदलेल असे वाटत नाही. सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशात काय निकाल लागतो याकडे असतील, हे तर नक्कीच! २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम असेल, हे तर खरेच!

अमित शाह यांनी १७ डिसेंबरला योगी आदित्यनाथ यांचे गुणगान केले. त्यांना तसे करण्यावाचून काही पर्यायही नव्हता, म्हणा! त्या गुणांच्या यादीतला एक  मुद्दा महत्त्वाचा. अमित शहा म्हणाले, योगी यांनी उत्तर प्रदेशातले माफिया आणि गुंडांचे राज्य संपविले!  सपा, बसपा यांनी गुंडांना आश्रय दिला, पण योगी यांच्या काळात मात्र गुंड राज्य सोडून गेले, असे अमितभाईंचे म्हणणे! माफिया कशाला म्हणतात हे न उमजल्यामुळे कदचित त्यांनी हा दावा केला असावा. ‘‘सतत एकमेकांबरोबर असलेला, सारखेच उद्योग करणारा आणि आपल्यामुळे  इतरांची हानी झाली तरी एकमेकांना संरक्षण देत राहणारा गट’’ असा माफिया या संज्ञेचा अर्थ आहे.  ही व्याख्या तर उत्तर प्रदेशला चांगली लागू पडते. दक्षता पथकांचे गुंड तेथे मनगटशाहीच्या जोरावर भय निर्माण करत आहेत. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांचेच अभय या मंडळींना असते, हे तर  उघड गुपितच!

माफिया आणि गुंडांना कायद्याची कदर असत नाही. हरिद्वारमध्ये नुकतेच जे घडले, त्यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते. विष ओकणारी भाषणे तेथे झाली. उघडपणे वंशहत्येची चिथावणी दिली गेली.  सरकारवर किंचित जरी टीका झाली तरी, थेट देशद्रोहाची  कलमे लावायला एरवी धावणारे सरकार, हरिद्वारला पोलिसांच्या समोर जे घडले, त्यावर मात्र गप्प बसले; हा विरोधाभासच म्हणायचा. कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी आपणहून किमान एक एफआयआर तरी दाखल करायचा? शिवाय, ही काही एकटीदुकटी घटना नाही. पाळेमुळे घट्ट रोवलेल्या संघटनांचे हे जाळे हल्ली वारंवार कायदा पायदळी तुडवते. 

हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल आणि छोटे गट उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. ‘जय श्रीराम’ म्हटले नाही म्हणून विशिष्ट समाजाच्या लोकांना त्रास दिला जातो. आपल्या पालकांच्या रक्षणासाठी रडत करुणा भाकणाऱ्या मुलांनाही ठोकरले जाते. ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांना थेट पाकिस्तानीच ठरवले जाईल, असे वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ९ नोव्हेंबरला केले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेब - शिवाजी यांचे संदर्भ मुद्दाम दिले जात आहेत. कारण फूट पडण्याचा कार्यक्रम त्यातून राबवायचा आहे.

विशिष्ट जातींना लक्ष्य करून मतांवर डल्ला मारण्यासाठी राजकीय ध्रुवीकरण करणारी राजवट एका अर्थाने “लोकशाही मार्गाने आवाज उठवणे” हा गुन्हा ठरविण्याच्या मागे लागली आहे. कायदा धार्मिक बाबतीत तटस्थ असतो म्हणणारे सरकार वागते मात्र उलटे, असे आकडेवारीवरून दिसते. हिंदुत्वाच्या विचारांशी संगनमत असलेले प्रशासन  प्रत्येक धर्मांतराकडे संशयाने पाहते. सरकारात वर्चस्व असलेल्या जातीचे लोक महत्त्वाच्या पदांवर सजातीयांना नेमतात. निवडणुकीच्या काळात सरकार पक्षासाठी ते काम करतील, हे काय वेगळे सांगायला हवे? लोकांची भावना तर अशीच झालेली दिसते. गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया वैध ठरविल्या जाण्याचा अनुभवही उत्तर प्रदेशात वारंवार येतो.

योगींच्या उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांची सरसकट धरपकड केली. ही धरपकड अमानुष होती. मुस्लिम वस्त्यांमध्ये पोलीस गेले, घरात घुसून त्यांनी वस्तू बाहेर फेकल्या, मालमत्तेचा विध्वंस केला; असे घटना पाहणारे सांगतात. तसे व्हिडीओ उपलब्ध आहेत. पोलीस म्हणतात, गोळीबार झाला नाही. तरी गोळ्या लागून २२ माणसे मरण पावली. 

कोरोना साथीच्या काळात तर सरकारला विरोध, असहमती सहन न करण्याचे  प्रकार आणखीनच तीव्र झाले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणिवा दाखविणाऱ्या पत्रकारांवर खटले दाखल करण्यात आले. ऑक्सिजनचा तुटवडा तसेच जीवरक्षक औषधे न मिळणे यावर टीका करणाऱ्या पत्रकारांवर, सरकारी आरोग्य व्यवस्था कशी कमी पडते आहे हे दाखवणाऱ्या नागरिकांवर खटले भरले गेले. 

“गुंडांचे राज्य संपले” हा योगींचा दावा पोकळ आहे. गोहत्या ते ‘लव्ह जिहाद’वर पोसली गेलेली ही नवी हिंदुत्व विचारसरणी दुसऱ्या जमातीला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आता परिस्थिती त्याही पुढे चाललेली दिसते. यापुढची भाषणबाजी जातीय विद्वेषाने भरलेली, अधिक विषारी असेल. भाजपाशासित राज्यातले पोलीस गम्मत पाहतील, निवडणूक आयोग काही प्रकरणांवर मूग गिळून बसेल. उत्तर प्रदेशातली स्वयंघोषित दक्षता पथके ही एकमेकांशी पक्की जोडली गेलेली, आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी विशिष्ट जमातींना लक्ष्य करणारी यंत्रणा आहे हे उघडच आहे. मग उत्तर  प्रदेशातून जे निघून गेले आणि जे आजही तिथे आहेत, ते माफिया गुंड नेमके कोण?

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी