शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एकदा स्वत:शी बोलून तर बघा!

By admin | Updated: April 10, 2016 02:37 IST

नुकतीच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने अवघ्या २४ व्या वर्षी आपले आयुष्य संपवून टाकले. जिया खान हे त्यातलंच अजून एक उदाहरण... यांच्या आयुष्याला भेडसावत असलेला हा प्रश्न कोणता

विशेष  -  डॉ. स्वप्ना पाटकरनुकतीच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ने अवघ्या २४ व्या वर्षी आपले आयुष्य संपवून टाकले. जिया खान हे त्यातलंच अजून एक उदाहरण... यांच्या आयुष्याला भेडसावत असलेला हा प्रश्न कोणता की, ज्याचे उत्तर केवळ आत्महत्या..? या जगात संवाद साधल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. फक्त तो साधणे खूप महत्त्वाचे आहे. दुरून डोंगर साजरे या उक्तीला साजेशी आहे ही ताऱ्यांची दुनिया... या चंदेरी जगाच्या शोधात कित्येक पावलं या दिशेने चालायला लागतात आणि मग एक-एक करून समोर येणाऱ्या आव्हानांपुढे गुडघे टेकतात. 'नेम आणि फेम' कमावण्याच्या उद्देशाने छोट्या शहरातल्या हजारो तरुण-तरुणी या मुंबापुरीत येऊन थडकतात... आपली स्वप्न हे मुंबई शहर नक्की पूर्ण करेल या विश्वासाने या शहरात पाऊल टाकतात. कसेतरी पैसे जमवून मोठाल्या अ‍ॅक्टिंग स्कूल्समध्ये दाखला घेतात. छोटासा रोल मिळवण्यासाठी कित्येक प्रोडक्शन हाउसच्या पायऱ्या झिजवतात. पार्टीजमध्ये उपस्थित राहून अचूक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. अशी ही रोजची धावपळ... या स्पर्धेत यशस्वी होण्याचा अट्टाहास कित्येकांच्या जिवावर बेतला आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने, नैराश्य आणि त्या नैराश्यातून आत्महत्या...आयुष्यात प्रसिद्धीबरोबर जबाबदारी येते. लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्यात आपला रोल मॉडेल शोधतात, तेव्हा आपण एक उत्तम उदाहरणाच्या रूपात लोकांसमोर येणे महत्त्वाचे... अनेक प्रसंगात नैराश्य येते. ते स्वाभाविकही आहे, पण या सगळ्यात संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. कुटुंबातल्या जवळच्या सदस्याशी किंवा एखाद्या चांगल्या मित्राशी साधलेला संवाद बऱ्याच संकटांवर उपाय ठरू शकतो. काही वेळा मनोवैज्ञानिकाची मदत घेता येऊ शकते. कुटुंबाशी बांधिलकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक कुटुंबाने याचा विचार करावा. आपल्या पाल्याला, ‘आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत,' हा विश्वास पालकांना देता आला पाहिजे. चांगल्या किंवा वाईट विषयावर झालेली चर्चा बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला देऊन जातील.'सशक्त मन'...सशक्त शरीर सुंदर जीवनाचा पाया आहे. स्वत:वर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची वाट चालावी. भविष्याची आखणी करताना वर्तमानात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. नकारात्मक दृष्टी असणाऱ्या माणसांपासून शक्य तितके लांब राहा. कोणत्याही समस्येने निराश होऊ नका. आत्महत्येच्या विचारावर मात करण्यात शहाणपण आहे. आपल्या आयुष्याचा आनंद हा आपल्याच हातात आहे, तेव्हा तुमच्या आनंदाची सूत्र दुसऱ्या कोणाच्या हाती न देता, छोटे-छोटे आनंदाचे क्षण नक्की साजरे करा. आरशासमोर उभे राहिल्यानंतर आरशात असणारी ती व्यक्ती तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी समर्थ आहे, त्या माणसाशी साधलेला संवाद अनेक समस्यांचे निराकरण करेल. तेव्हा आपल्या कोणत्याही समस्येसाठी एकदा स्वत:शी बोलून तर बघा... (लेखिका मनोचिकित्सक आहेत.)