शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

राष्ट्रवाद व स्लो डाऊनमधील झगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:00 PM

सरकारवर डाग पडता कामा नये असे नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितले होते आणि मी तसा कारभार करून दाखविला....

- प्रशांत दीक्षित देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीला मंदी हा शब्द लावणे योग्य नाही असे जाणकार अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मंदी कशाला म्हणायचे याचे काही निकष अर्थशास्त्राने निश्चित केले आहेत. सध्याची परिस्थिती त्या निकषात बसत नाही असे ते म्हणतात. मंदी ऐवजी स्लो डाऊन हा शब्द योग्य आहे असे त्यांचे म्हणणे.इंग्रजीमध्ये स्लो डाऊन, रिसेशन, डिप्रेशन असे स्वतंत्र शब्द विशिष्ट आर्थिक परिस्थितीची ओळख करून देताना वापरतात. मराठीत असे स्वतंत्र शब्द नाहीत.तथापि, कुठलाही समाज काटेकोर व्याख्येत बोलत नाही. अगदी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत देशातही शब्दापेक्षा त्यामागची भावना लक्षात घेऊन लोकव्यवहार चालतो. स्वत:ची आर्थिक स्थिती अपेक्षे इतक्या वेगाने सुधारत नसली तर मंदी आली आहे, असेच सामान्य माणूस म्हणतो, हे भावनात्मक वर्णन असते.समाजाची ही सवय लक्षात घेतली तर सध्याच्या परिस्थितीचे वर्णन मंदी असेच करावे लागते.या मंदीचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होईल का हा चर्चेचा विषय आहे...

महाराष्ट्राचा विचार केला तर मागील पाच वर्षांत लोकांच्या जीवनमानात लक्षणीय फरक पडला असे काहीही फडणवीस सरकारकडून झालेले नाही. परकीय गुंतवणुकीसारख्या काही क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी ही आघाडी गेल्या कित्येक वर्षांतील कारभाराचा परिणाम आहे.त्यात फडणवीस सरकारचे कर्तृत्व फार नाही. उलट गुंतवणुकीचे प्रमाण घटलेले आहे. महाराष्ट्रातील राहणीमान सुधारले, त्याचा दर्जा वाढला, मूलभूत सोयीसुविधा मुबलक व सुलभ मिळू लागल्या असा नागरिकांचा अनुभव नाही.रोजगार वाढलेला नाही. गावातील तरूण शहरात आले तर त्यांना नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. शहरातील तरूणांनाही नोकरी मिळविणे सुलभ झालेले नाही. शहरात नवे घर घेणे अशक्य झाले आहे. पाणीपुरवठा, शहरी वाहतूक, आरोग्यसेवा यामध्ये गुणात्मक फरक पडलेला नाही. शेतीचे उत्पादनवा शेतमालाचे भाव यामध्ये फार वाढ झालेली नाही. जलशिवारसारख्या काही योजनांमध्ये फडणवीस सरकारने चांगली कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या प्रचारसभेत केलेल्या कामांची जंत्री देतात आणि महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे हे कळकळीने सांगतात. तरीही शहरी मध्यमवर्गाच्या डोळ्यात भरेल अशी कोणतीही कामगिरी फडणवीस सरकारला करता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अलिकडे आलेली मोठी गुंतवणूक सांगा, असा प्रश्न 'लोकमत' कडून विचारला गेला असता मुख्यमंत्र्यांना उत्तर देता आले नव्हते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कालखंडाचे चित्र याहून वेगळे नव्हते. त्यावेळीही काही चांगली कामे होत असली तरी सरकारने रेटा लावून काही बदल घडवून आणला अशी उदाहरणे नव्हती. काहीशा तशाच पद्धतीने फडणवीस सरकारने गाडा पुढे चालू ठेवला.मात्र दोन गोष्टींमध्ये मागील सरकार व फड़णवीस सरकार यांच्यात फरक करता येतो आणि याच फरकावर भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा जोर असणार आहे हे नाशिकच्या सभेतून लक्षात येते. या दोन गोष्टी म्हणजे राष्ट्रवादाचा प्रभावी परिणाम आणि भ्रष्टाचाराचा कलंक नसलेले सरकार. याच दोन अस्त्रांचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक भाजपाला अनुकूल करून घेतली. आता तीच दोन अस्त्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात वापरीत आहेत.

सरकारवर डाग पडता कामा नये असे नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितले होते आणि मी तसा कारभार करून दाखविला, असे फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत जनसमुदायाला सांगितले. फडणवीस यांनी नेत्रदिपक कामगिरी करून दाखविली नसली तरी त्यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही बाब लोकांसाठी फार महत्वाची आहे. 

मोदी, शहा, फडणवीस या नेत्यांबद्दल लोकांशी बोलताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते. हे नेते कारभारात अनेकदा कमी पडतात हे लोकांना जाणवते, पण हे नेते स्वत:ची धन करून घेत नाहीत, जे काही करतात ते देशासाठी किंवा पक्षासाठी प्रामाणिकपणे करतात, अशी बहुसंख्य नागरिकांची भावना आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाAmit Shahअमित शहा