शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:42 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस सरकारला एका दिवसाच्या आत विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितल्यानंतर, काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार तगणार नाही, हे स्पष्ट झालेच होते. फडणवीस यांनीही त्यामुळे आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. त्यांचे सरकार जेमतेम ७८ तास टिकले. अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, या भरवशावर भाजपचे नेते व देवेंद्र फडणवीस विश्वास ठेवून होते आणि त्या आधारेच त्यांनी सरकार बनविण्याचा खटाटोप केला, पण प्रत्यक्षात अजित पवार यांना शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने एकटे पाडले, तेव्हाच हे सरकार टिकणार नाही, हे स्पष्ट झाले. भाजपने अजित पवार यांना सोबत घेण्याच्या खेळीमुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ऐक्य अधिक मजबूत झाले.

या ऐक्यातील १६२चा जादुई आकडा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी परेड करून आणि सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनात सादर करून दाखवूनही दिला. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र आणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधीच भाजपला मिळू दिली नाही, शिवाय तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब विश्वासदर्शक ठराव मांडायला लावा, असा आग्रह धरला. न्यायालयात जाण्याचा त्यांचा निर्णय यशस्वी ठरला. हा निर्णय अतिशय दूरगामी परिणाम करणारा आहे. अनेक राज्यांत भाजप व पूर्वी काँग्रेसने फोडाफोडी करून सरकारे स्थापन केली आहेत. गेल्या वर्षी कर्नाटकातही असे नाट्य पाहायला मिळाले होते, पण न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने एखाद्या पक्षाला संख्याबळ न तपासता सरकार स्थापण्याची संमती देण्याआधी राज्यपालही चार वेळा विचार करतील.आता हा मुद्दाच निकालात निघाला असून, महाविकासआघाडीचे सरकार राज्यात येणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे नक्की आहे. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत़ या पक्षांनी कायम एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे आता किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार चालविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. सत्तावाटपाच्या सूत्राबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. हे मतैक्य राज्याचा कारभार चालविताना कायम राहावे आणि जनतेचे, विशेषत: आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अडथळे येऊ नयेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिघांना एकत्र आणण्यात आणि अजित पवार यांना भाजपपासून दूर करण्यात सर्वात मोठा वाटा शरद पवार यांचा आहे. त्यामुळे सरकार चालवितानाही त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
राज्यात कोणाचेही सरकार आले, तरी ते पाच वर्षे राहावे, अशी जनतेची इच्छा असते. सर्व राजकीय पक्षांनी सत्तेसाठी केलेले साटेलोटे लोकांना आवडलेले नाही. ही जनभावना लक्षात घेऊन, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यापुढे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही नेत्यांना सरकारमधील कामाचा अनुभव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे मात्र रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव यांच्या हातीच सत्ता येणार आहे. दोन्ही काँग्रेस व इतर पक्ष यांना न दुखावता कारभार हाकणे सोपे नाही. विरोधी बाकांवर १0५ आमदार असलेला भाजप असल्याने सतत सत्तासंघर्ष होतच राहील. तरीही विरोधी पक्षाचे महत्त्व जाणून त्यांचा सन्मान करणे, निर्णय घेताना विश्वासात घेणे हे उद्धव ठाकरे यांना करावे लागेल. भाजपने या सरकारला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ते मिळणे वाटते इतके सोपे नाही, पण भाजपनेही विरोधासाठी विरोध न करता राज्याच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस