शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हसू असावे ओठांवरती...

By admin | Updated: April 21, 2017 01:31 IST

प्रल्हाद जाधवमदतीला धावून जाणे हे माणसाच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. अशा मदतीच्या शेकडो कथा रोज कानी पडत असतात

प्रल्हाद जाधवमदतीला धावून जाणे हे माणसाच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. अशा मदतीच्या शेकडो कथा रोज कानी पडत असतात. पण खऱ्या अर्थाने मदत ही सोपी गोष्ट नाही. मदतीला धावून जाताना आपण त्यात काही निवड करत आहोत का, त्यात माझे तुझे करत आहोत का, सोपा मार्ग निवडत आहोत का, त्यामागे आपला काही छुपा हेतू आहे का, मदत अनिच्छेने करतोय का, कुणाच्या दडपणाखाली करतोय का, निर्भेळ आनंदाने करतोय का, यासारखे कितीतरी प्रश्न पडतात आणि तिथे आपल्या तथाकथित मदतकार्याचे पितळ उघडे पडते. सामान्यपणे माणूस जगताना सोपा रस्ता धरतो. कमी श्रमात अधिक लाभ मिळावा, अशी मनीषा बाळगतो. अभ्यास हा शिकण्यासाठी नाही तर परीक्षेत पास होण्यासाठी आहे, अशी त्याची धारणा असते. हा विचार आयुष्यभर त्याला जगण्याच्या उथळ पातळीवर ठेवतो. खोलात जाऊन जीवन समजून घेणे आणि सार्थकी लावणे त्याला आवश्यक वाटत नाही. कधीतरी वाढदिवसाला अनाथाश्रमातील मुलांना जेवण देणे किंवा कधीतरी एखाद्या पुनर्वसन संस्थेस डोनेशन पाठवून मोकळे होणे यात अनेकजण धन्यता मानतात. वर या दातृत्वाचे मार्केटिंग करून त्याचा वापर स्वत:च्या प्रतिमावर्धनासाठी करून घेतात, याला खरेच मदत किंवा सेवा म्हणता येईल का? उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये असे म्हणतात; पण वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळे वाटायला जाताना सोबत फोटोग्राफर घेऊन जाण्याची प्रथा अनेकांनी सुरू केली आहे. त्यात कुणाला काही काही गैरही वाटत नाही. माणसाच्या संवेदना बधिर करणारे असे अनेक बदल व्यवहारात आले आहेत. त्या गुंगीत जगणे धन्यतेचे लक्षण ठरले आहे. शब्दांचे अर्थ बदलत आहेत. मदत ही दुसऱ्यासाठी नसून स्वत:च्या फायद्यासाठी करायची गोष्ट, असा नवा अर्थ उदयाला येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, एखाद्याने स्वत:च्या जगण्याचे मोल देऊन एखाद्याचा जीव वाचवल्याची घटना कानी येते तेव्हा मदत हा शब्द अमृतात भिजून समोर उभा आहे असे वाटते. स्वप्नात दिलेले वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र, मृत्यूशय्येवरही आपला सोन्याचा दात याचकाला देणारा कर्ण किंवा महारोग्याच्या जखमा कोणताही किंतू मनात न ठेवता साफसूफ करणारे बाबा आमटे आपल्या कृतीने वचन, दातृत्व, सेवा, यासारख्या शब्दांना नवा अर्थ देऊन जातात, हा एक दिलासा आहे. विंदांनी एका कवितेत म्हटले आहे ते लक्षात ठेवण्यासारखे आहे -हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना...