शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: इराणची ‘लेडी डॉन’, जिनं अमेरिकेला चकवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:20 IST

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी रात्री एका महिलेला शस्त्रांसह अटक करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. केवळ अमेरिका आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण जगभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही महिला? आणि तिनं असं केलं तरी काय, ज्यामुळे जगभरात सध्या तिचा बोलबाला आहे? 

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी रात्री एका महिलेला शस्त्रांसह अटक करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. केवळ अमेरिका आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण जगभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही महिला? आणि तिनं असं केलं तरी काय, ज्यामुळे जगभरात सध्या तिचा बोलबाला आहे? या महिलेचं नाव आहे शमीम माफी. पण, त्याहीपेक्षा ‘लेडी डॉन’ म्हणून ती अधिक प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या डोळ्यांत धूळ फेकत गेली अनेक वर्षे तिचे कारनामे अखंड सुरू होते.  इराण सरकारसाठी शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. इराणमध्ये बनवलेले बॉम्ब, ड्रोन, बॉम्ब फ्यूज आणि लाखो राउंड दारूगोळ्याशी संबंधित व्यवहारांमध्ये मुख्य दलाल म्हणून काम करीत असल्याचा तिच्यावर संशय आहे.

अतिशय पद्धतशीर आणि थंड डोक्यानं ती काम करायची. त्यातूनच तिनं एक मोठ्ठं नेटवर्क उभारलं होतं आणि त्या माध्यमातून ती शस्त्रास्त्रांची तस्करी करायची. ४४ वर्षांच्या शमीमनं इराणी बनावटीचे ड्रोन, बॉम्ब आणि लाखो टन दारूगोळा सुदानला विकल्याचा आरोप आहे.अमेरिकन अटॉर्नी बिल एसेली यांनी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, वुडलँड हिल्स येथील ४४ वर्षांच्या शमीमनं शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी अनेक कुमार्गांचा वापर केला आणि त्यातून प्रचंड पैसा कमावला. 

शमीमची कहाणीही अतिशय रोमहर्षक आहे. शमीम मूळची इराणी नागरिक असून, २०१३ मध्ये तिनं आपला देश सोडला आणि २०१६ मध्ये अमेरिकेची कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी बनली. त्यानंतर हळूहळू तिनं आपलं जाळं पसरायला सुरुवात केली. राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवला आणि त्यानंतर शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या मार्गांतून ‘लेडी डॉन’ अशी तिची प्रतिमा तयार झाली.

अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांच्याकडे असलेल्या फोन रेकॉर्डनुसार डिसेंबर २०२२ ते जून २०२५ दरम्यान शमीम इराणच्या गुप्तचर आणि सुरक्षा मंत्रालयाच्या थेट संपर्कात होती. सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, अशा व्यवहारांसाठी तिच्याकडे आवश्यक कायदेशीर परवानगी नव्हती. 

एकीकडे तिच्यावर हे आरोप होत होते; पण, दुसरीकडे मात्र तिची सार्वजनिक प्रतिमा वेगळीच दिसत होती. तिथे ती बरीच लोकप्रिय होती. सोशल मीडियावर आपली आलिशान जीवनशैली दाखवणारे फोटो ती वारंवार शेअर करीत असे. आपले परदेशदौरे आणि महागड्या मर्सिडीज-बेन्झ रोडस्टरसह काढलेले फोटो यामुळेही सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा होती.

शस्त्रास्त्र तस्करीच्या गुन्ह्यात न्यायालयात शमीम दोषी ठरल्यास तिला फेडरल तुरुंगात जास्तीतजास्त २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तपासकर्त्यांचा आरोप आहे की शमीमनं हे व्यवहार सुलभ करण्यासाठी ओमानमध्ये नोंदणीकृत ‘एटलस इंटरनॅशनल बिझनेस’ या कंपनीचा वापर केला; यापैकी काही व्यवहार कथितपणे २०२५ पर्यंत सुरू होते.दरम्यान, न्यायालयीन कागदपत्रांमध्ये तिचे काही व्यवहारही नमूद करण्यात आले आहेत. त्यात इराणी संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दल लॉजिस्टिक्सकडून तयार करण्यात आलेल्या Mohajer-6 सशस्त्र ड्रोनसाठी ७० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा करारही समाविष्ट आहे. हे ड्रोन आणि त्यांच्यासोबत हजारो बॉम्ब फ्यूज कथितपणे सुदानच्या संरक्षण मंत्रालयाला पुरविण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's 'Lady Don' Bypassed US, Arms Smuggling Exposed

Web Summary : Shameem Mafi, the 'Lady Don', faces charges for smuggling arms for Iran. Accused of trafficking bombs and drones, she allegedly used her network to sell weapons, including Iranian drones to Sudan. She faces up to 20 years in prison if convicted.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIranइराण