शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

लेनेके देने पडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 23:00 IST

‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो

‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो, तेव्हां वास्तव जीवनातही आपण तसेच काही करुन आपला हेतू साध्य करुन घेऊ असा काही विचार कपिल शर्मा यांनी केला असावा. पण आपण ज्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आज पोहोचलो आहेत त्यातील रिअ‍ॅलिटी आणि वास्तवातील रिअ‍ॅलिटी यामधील अंतर एव्हाना त्यांच्या लक्षात आले असावे. कारण गेल्या सप्ताहात भल्या सकाळी त्यांनी टिवटिवाट करुन जो गोंधळ उडवून दिला त्यापायी खुद्द त्यांच्यावरच ‘लेने के देने पडे’ अशी वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईतील शर्मा यांंच्या कार्यालयाच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या कुणा (आजही अज्ञात) अधिकाऱ्याने पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार त्यांनी टिवटिवली व तसे करताना त्यात थेट पंतप्रधानांना खेचून घेतले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लगोलग या तक्रारीची दखल घेतली आणि टीकेचे भले मोठे मोहोळ अंगावर ओढवून घेतले. पण मुख्यमंत्री जातीने दखल घेतात म्हटल्यावर त्यांच्या हाताखालचेही सारे जातीने दक्ष झाले आणि त्यातून बाहेर पडला तो चक्क कपिल यांचाच कांगावखोरपणा. त्यातून एक शक्यता अशी दिसून येते की, आता त्यांच्यावर अनधिकृत काम करण्याचा आणि खारफुटीचे वाटोळे करण्याचा जो ठपका ठेवला गेला आहे, त्याची दाबादाबी करण्यासाठीच कुणा दयाळू अधिकाऱ्याने पाच लाख मागितले असावेत व शर्मांना ते फुकटात करुन हवे असावे. पण त्यांनी पंतप्रधानांच्या जाकिटालाच हात घातला आणि स्वत:च्या हातांनी स्वत:च्या पायांवर कुऱ्हाड मारुन घेतली. केवळ कार्यालयामध्येच नव्हे तर निवासस्थानीदेखील अनधिकृत बांधकाम करणे, खारफुटीची जमीन उद्ध्वस्त करुन सागरी किनारा प्रदेशात बांधकामासंबंधी असलेले निर्बन्ध उल्लंघिणे अशा अनेक आरोपांचे सुरे आता त्यांच्या दिशेने परजले जाऊ लागले आहेत. त्यांनी महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचा स्पष्ट आरोप केल्यामुळे तिथे सत्ता असलेली सेना-भाजपा युती तर खवळलीच आहे पण मनसे, सपा आदि पक्षदेखील (नजरेसमोर निवडणूक दिसत असल्याने) कपिलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या विचारात आहेत. तरीही हे कमीच म्हणून की काय ज्या खासगी चित्रवाणीवर त्यांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे त्या चित्रवाणीनेही हा कार्यक्रम संपविण्याचा म्हणे निर्णय घेतला आहे. मोदींशी कोण कशाला पंगा घेईल?