शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भल्या सकाळी दिवाळी पहाट

By admin | Updated: October 24, 2014 03:01 IST

दोनदा हो एकदम म्हटलं तर जसा ऐकू येईल तसा स्वर.. पण तो लिहून काढणं सर्वस्वी अशक्य आहे

संजय मोने ( प्रसिद्ध अभिनेते लेखक) - (कुठल्याही घराची पुढची खोली, जिला मराठी नाटकाच्या सुरुवातीच्या रंगसूचनेत नाटककार दिवाणखाना म्हणतो. का म्हणतो? खाडिलकर, विष्णुदास भावे, गडकरी, वरेरकर, अत्रे, कानेटकर, इ. इ. जाणोत)तो- ही का ती?ती- नाही हो. मी काय सत्याग्रह करायला चाललेय? ती.. ती काढा अबोली रंगाची.तो- अबोली रंगाची साडी? पण जिथे जाणारेस तिथे जाऊन बोलायचंय ना तुला?ती- वा!.. म्हणून.. म्हणून तुम्हाला नेहमी सांगते टेलिविजन बघत चला. बरे विनोद असतात त्यावर तुमच्यापेक्षा.तो- विनोद नाही क्लेश आहेत माझे.ती- काय?तो- काही नाही. बरं..तू जाणारेस आणि बोलणार आहेस तो कार्यक्रमही दाखवणार आहेत टेलिविजनवर?ती- हो. (दोनदा हो एकदम म्हटलं तर जसा ऐकू येईल तसा स्वर.. पण तो लिहून काढणं सर्वस्वी अशक्य आहे.) पण आमचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे.तो- पहाटचा नाही गं. पहाटेचा कार्यक्रम.ती- बटाटेवडाला आपण बटाटवडा नाही का म्हणत?तो- तुझं बरोबर.. माझं चुकलं.ती- बरोबर आठ वाजता सुरू होईल कार्यक्रम.तो- रात्री?ती- रात्री कसा? पहाट नाही का?तो- सकाळी आठ वाजता कोणाची पहाट होते?ती- दिवाळी सकाळला कोण विचारतो? पहाटच लागते रसिकांना.तो- हो? त्या तुझ्या रसिकांकडे घड्याळं नाहीत वाटतं?ती- आहेत; पण त्यांच्या सोसायटीत आठ वाजताच सूर्य दिसतो.तो- असा कसा दिसतो? आठ वाजता?ती- त्यांच्या इमारतींसमोर सगळ्या इमारती चोवीस चोवीस मजल्यांच्या आहेत, त्यांच्यामुळे यांचा सूर्य अडतो.तो- पण त्यावाचून तुमचं काहीच अडलेलं दिसत नाही.ती- बहुरंगी कार्यक्रम आहे. गाणी, कविता वाचन, किस्से... शिवाय रसिकांना फराळ कॉफी आहे. मधुमेह असलेल्यांना शुगर फ्री कॉफी आहे वेगळी. शिवाय कपबशी नृत्यही आहे. तारा बेळूब्बीचं आणि हो! सगळ्यात शेवटी राधा-श्रीराम या जोडप्याची मुलाखत.तो- राधा आणि श्रीराम हे जोडपं? ती- अहो! नवीन मालिकेतलं जोडपं आहे. तुझ्या माझ्या संसाराची गोडी आहे अवीट! आपल्या नव्या नात्यावर लागे सोनियाची वीट!तो- हे इतकं मोठं नाव? टायटलचं गाणं संपल्यावर वेळ उरतो का दृश्य दाखवायला?ती- भयानक लोकप्रिय आहे मालिका.तो- लोकप्रिय आणि भयानक? चांगलं आहे.ती- सध्या त्यांच्या मालिकेत फार रंगतदार प्रसंग चालू आहेत. तिचे एका अपघातात डोळे गेलेत आणि तो डॉक्टर झालाय. म्हणजे आधी तो मूर्तीकार होता, पण तो आता सर्जन झालाय.तो- अचानक? अगं याला काही लॉजिक आहे का?ती- आपलं लग्न झालं त्याला काही लॉजिक होतं का?तो- बरं. बरं.. तुझं निवेदन तयार आहे ना?ती- ऐका हं... रसिकहो, आज दिवाळी आहे.. दिवाळी म्हणजे रंगांचा सण, दिव्यांचा सण, फराळाचा सण, आनंदाचा सण...तो- दिवाळी आहे हे सगळ्यांना माहीत असणार ना? ती- कवी केयूर खांडभदाले त्यांच्या कविता सादर करणार आहेत.तो- खांडभदाले? या नावाचा कवी?ती- मग! विद्रदोही आहे म्हणे.तो- विद्रदोही नाही गं, विद्रोही.ती- हो का? जरा सुधारून घेते हां... तर त्यांची नवीन कविता ते सादर करणार आहेत ..काय बरं..हां माये! आली आली तुझी दिपवाळी. माह्या बापाच्या काविळीहून पिवळी. मागे गणपतीत त्यांनी सादर केली होती ती पण छान होती. आजे! आज्जे! आला आला तुझा गजानन. झाला आजोबा धा दिसं टून्न.तो- वा! खूपच विद्रोही आहे हा भदाले.ती- शिवाय होळी, गणपतीचं आयटम साँग, नारळी पौर्णिमेच्या वेळी म्हटलं जाणारं कोळीगीत.. ही गाणी आहेत. मग दोन-तीन विनोदी कलावंतांचे किस्से.तो- हे सगळं दिवाळीत?ती- या वर्षी तर बहुतेक जण दिवसभर बिझी आहेत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात. शिवाय खास म्हणजे दोन हिरोइन्स सादर करणार आहेत त्यांच्या आवडीची दोन नृत्ये. आहे की नाही खास? तुम्ही येणार ना कार्यक्रमाला?तो- तुझ्या कार्यक्रमाला माझ्या इथूनच शुभेच्छा!