शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महामारीला निमंत्रण

By admin | Updated: December 9, 2015 23:53 IST

जागतिक एड्स निर्मूलन दिन नुकताच साजरा झाला. काही वर्षांपूर्वी एड्स या आजाराने प्रचंड दहशत निर्माण केली होती. कालौघात ती दहशत बरीच ओसरली असली तरी

जागतिक एड्स निर्मूलन दिन नुकताच साजरा झाला. काही वर्षांपूर्वी एड्स या आजाराने प्रचंड दहशत निर्माण केली होती. कालौघात ती दहशत बरीच ओसरली असली तरी, हा रोग हद्दपार करण्यासाठी अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. जागतिक आरोग्य संघटना (हू) त्यासंदर्भात अत्यंत गंभीर आहे. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) मात्र ‘हू’ची री ओढण्यास तयार नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला, मग तो आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर असो, ‘अ‍ॅन्टिरिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) पुरविलीच गेली पाहिजे, अशी शिफारस ‘हूू’ने जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या पूर्वसंध्येला केली. बहुतांश देशांनी त्या शिफारसीचे पालन करण्यास होकार दिला असताना, ‘नॅको’ने मात्र यासंदर्भात वेगळी भूमिका घेऊन भारत त्यासाठी तयार नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले आहे. भारताने गेल्या दीड दशकात एड्सच्या संकटाचा खूप चांगल्या रितीने मुकाबला केला. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी व उपचारांसाठी बराच पैसाही ओतला. त्याचे चांगले परिणाम समोर आले असून, एड्सने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात निश्चितपणे घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅको’ने घेतलेल्या ताज्या भूमिकेमुळे एवढ्या वर्षांत केलेल्या चांगल्या कामावर पाणी फिरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णांसाठी ‘एआरटी’ ही जीवरक्षक उपचार प्रणाली आहे. भारतात आजवर ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना ‘एआरटी’ औषधे मोफत दिली जात असत. ‘सीडीफोर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशी मानवी शरीरातील रोग प्रतिबंधक प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. या पेशींची संख्या जेवढी कमी तेवढी त्या रुग्णाची रोग प्रतिबंधक शक्ती कमी असते. यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही ‘एआरटी’ औषधे मोफत देण्याचे भारताने मान्य केले आहे; मात्र ती प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत पुरविली पाहिजे, ही ‘हू’ची भूमिका आहे. जर एवढी वर्षे ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना मोफत ‘एआरटी’ औषधे देऊनही परिस्थिती नियंत्रणात आहे, तर यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही मोफत औषध दिल्याने परिस्थितीत सकारात्मकच बदल होईल, अशी ‘नॅको’ची भूमिका दिसते. भारतातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना मात्र ही भूमिका मान्य नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत ‘एआरटी’ औषधे पुरविणे, हाच एड्सशी लढा देण्याचा योग्य मार्ग आहे, अवघ्या जगाने तो स्वीकारला आहे आणि आपणही जगाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. या मतभेदांच्या परिणामी एड्स रुग्णांचे बळी गेले नाहीत आणि या महाभयंकर आजाराने महामारीचे रुप धारण केले नाही, म्हणजे मिळवली!