शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

संपादकीय: व्हॉट्सॲपचे काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:32 IST

व्हॉट्सॲप हे जगप्रसिद्ध मेसेजिंग ॲप. याची सेवा सर्वांसाठी मोफत सुरू झाली त्याला आता ११ वर्षे उलटून गेली आहेत. हे ॲप जगात जेव्हा सुरू झाले तेव्हा जलद संवाद-संपर्काचे मोठे माध्यम उपलब्ध झाल्याचा केवढा आनंद झाला होता.

अनेक वर्षे एखादी गोष्ट मोफत द्यायची. त्याची सवय लावायची. त्या सवयींच्या जाळ्यात अडकवायचे आणि मग या सवयींचेच भांडवल करायचे. काही दिवसांनी त्यात अडकलेल्यांना नियम, अटींनी जखडून त्यांचा फायदा घ्यायचा. जगातील बहुतांश कंपन्या याच तत्त्वावर सुरू झाल्या आणि उभ्या राहिल्या आहेत. या दुष्टचक्रातून आता व्हॉट्सॲपचे वापरकर्तेही जाणार आहेत.

व्हॉट्सॲप हे जगप्रसिद्ध मेसेजिंग ॲप. याची सेवा सर्वांसाठी मोफत सुरू झाली त्याला आता ११ वर्षे उलटून गेली आहेत. हे ॲप जगात जेव्हा सुरू झाले तेव्हा जलद संवाद-संपर्काचे मोठे माध्यम उपलब्ध झाल्याचा केवढा आनंद झाला होता. आमची सेवा अत्यंत सुरक्षित आहे, कोणाच्याही वैयक्तिक संवादात आम्ही पडत नाहीत आणि तो संवाद आम्ही पाहतही नाही, यूझर्सच्या गोपनीयतेचा सन्मान राखणे, हे आमच्या डीएनएमध्येच असल्याचा दावा व्हॉट्सॲपने गेली कित्येक वर्षे केला. त्यामुळे हे ॲप वापरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आपल्या हातात असलेले संवादाचे माध्यम अत्यंत सुरक्षित असल्याची भावना त्यामागे होती. त्यामुळे वैयक्तिक वापराबरोबरच कार्यालयीन कामांसाठी, चर्चांसाठी आणि निर्णयांसाठीही त्याचा उपयोग होऊ लागला. हा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. कालांतराने ही कंपनी फेसबुककडे गेली आणि हळूहळू बाजारातील नफ्या-तोट्याच्या आणि स्पर्धेच्या जोखडात अडकत गेली. आम्ही कोणतीही माहिती कोणासही शेअर करत नाही, असा दावा करणारी हीच कंपनी मग आम्ही फेसबुकसोबत काही माहिती शेअर करतो असे हळू आवाजात सांगू लागली. आता तर त्याही पुढे जाऊन कंपनीने प्रचंड मोठे पाऊल उचलले आहे. या पावलामुळे आधी असलेली १०० टक्के सुरक्षेची भावना हिरावली जाणार आहे. वैयक्तिक सुरक्षिततेला तडा जाणाऱ्या नियम व अटी लादल्या जाणार आहेत आणि त्या स्वीकारणे वापरकर्त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या अटी मान्य करा किंवा व्हॉट्सॲपवरून चालते व्हा, असा तुघलकी फतवा या कंपनीने काढला आहे.

नव्या अटी स्मार्टफोनच्या बाजारात फुकटात उपलब्ध असलेल्या अगदी फुटकळ ॲपच्याच तोडीच्याच आहेत. आता व्हॉट्सॲप सगळ्याच यूझर्सचे मोबाइल नंबर सेव्ह करून ठेवणार. प्रत्येक यूझर्सच्या मोबाइलमध्ये असलेले कॉन्टॅक्टसही उचलणार. यूझर्सचा आयपी अड्रेसही घेणार आणि लोकेशनही जाणून घेणार. हे कमी की काय, तुमच्या मेसेजेसवरही लक्ष ठेवणार. म्हणजे तुम्ही कुठे जाता, कोणाशी बोलता, काय बोलता आणि कोणत्या वेळी बोलता... हे सारे तुमच्या पूर्वपरवानगीने ही कंपनी नोंदवून ठेवणार आणि त्याचा वापर थेट बाजारातील विविध स्पर्धात्मक गोष्टींसाठी करणार. तुम्ही मित्राशी एखाद्या प्रोडक्टविषयी चर्चा केली, एखादी लिंक शेअर केली तर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या फेसबुकवर आणि एवढेच काय तुमच्या मोबाइलवरील विविध ॲप्सवरही त्या वस्तू वा सेवेच्या जाहिराती झळकू लागतील आणि त्यातून तुमच्या मनावर जाहिरातदारांना हवी ती गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला हे मान्य असेल तर आमच्या सेवा घ्या, अन्यथा फुटा, असा हा फतवा कंपनीच्या उदयाच्या काळातील तत्त्वांनाच तडा देणारा आहे. असे करून या जगप्रसिद्ध कंपनीने पायावर धोंडा पाडून घेतला आहे. फेसबुकने आपल्या यूझर्सच्या गोपनीय माहितीचा वापर अनेक देशांतील निवडणुकांसाठी करू दिल्याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यावरून मोठा गदारोळही झाला होता. जगभरातील लोकांनी त्यावर आवाज उठवला होता. याचाच दुसरा अध्याय नव्या रूपात येत आहे.

फेसबुकवर जेवढे लोक बोलत नाहीत त्याच्या कैकपटीने व्हॉट्सॲपवर संवाद साधतात. लाखो कंपन्यांनी आपल्या अंतर्गत संवादासाठी व्हॉट्सॲपचा वापर सुरू केला आहे. इथून पुढे ही सर्व माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या हाती लागणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सवयीचा, आचार-विचारांचा आणि स्वभावाचा बायोडाटाच आता व्हॉट्सॲपकडे असेल. त्याचा कसा, कुठे, कधी वापर होईल, हे तुम्हालाही कळणार नाही; पण व्हॉट्सॲपची ही नवी खेळी एकदा सर्वांच्या ध्यानी यायला लागली की, या ॲपचा वापर मर्यादित होणार हे नक्की! व्हॉट्सॲपला पर्याय देण्यासाठी अनेकजण गेली अनेक वर्षे धडपडत आहेत आणि त्यातले काही अजूनही ॲपच्या बाजारात तग धरून आहेत. ते सारे पुन्हा उसळी घेणार. आधी यूझर्सना जाळ्यात अडकवून मग तुघलकी फतवा काढणारी ही कंपनी आता स्पर्धेत खालच्या पायरीवर येणार, हे भाकीत कोणीही वर्तवू शकेल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप