शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

...पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 3:16 AM

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे.

साऱ्या देशात संघाचे निशाण उंचावून फडकू लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील चिमुकल्या पक्षाच्या महत्त्वाकांक्षाही पतंगासारख्या आकाशात भराऱ्या घेत असतील तर तो त्या पक्षाच्या उतरत्या काळाचा व आत्महत्येच्या इराद्याचा पुरावा आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात अलीकडे झालेल्या भेटींमुळे त्यांचे पक्ष परस्परांजवळ येतील आणि किमान महाराष्ट्रात (बाहेर राष्ट्रवादी कुठेही नसल्यामुळे) त्यांचे बळ वाढेल असे वाटले होते. पवारांना याची जाणीव आहे. पण ज्यांचा विचार चिंचवड किंवा सांगलीबाहेर पोहोचत नाही, याची त्यांच्या छोट्या अनुयायांना जाणीव असेल असे वाटत नाही. त्याचमुळे विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा (व तीत पुन्हा एकवार आपटी खाण्याचा) निर्धार त्यांच्या संघटनेने आपल्या मुंबई बैठकीत परवा केला आहे.

पवारांचा पक्ष विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, कोकणात नाही, मुंबईत नाही. त्याचे जे काय किरकोळ स्वरूप असेल ते पश्चिम महाराष्ट्रातच तेवढे आहे. तेथेही आता मोहिते गेले, भुजबळांचे बळ क्षीण झाले आणि प्रत्यक्ष पवारांनाही निवडणूक लढविण्याची ‘इच्छा’ उरली नाही. एकाच नेत्याचा व एकाच घराण्याचा पक्ष असला की तो नेता व ते घराणे दुबळे होऊ लागले की तो पक्षच खंगत जातो. काँग्रेसचे तसे नाही. राहुल किंवा सोनिया यांच्यामागे शंभर वर्षांच्या लढ्याची व त्यागाची परंपरा आहे. तो पक्ष मूल्यांवर उभा आहे. पवारांचा पक्ष माणसांवर चालणारा आहे. अशावेळी राजकीय शहाणपण समर्थांच्या सोबतीने जाण्यात आह़े़ पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत. तीच अहंता त्यांच्या घरात आणि पक्षातील अनेकांत आहे. तळाचे कार्यकर्ते त्यांचे दुबळेपण सांगतात. पण त्यांचे ऐकतो कोण? पवारांची फडणवीसांशी भेट झाली किंवा मोदींना दोन मिनिटे भेटले तरी आपण बलवान आहोत, असे त्यांच्या पक्षातील अनेकांना उगाचच वाटत असते. पण त्या भेटीनंतर लगेचच मोदींचे सरकार प्रफुल पटेलांना जेव्हा आर्थिक अन्वेषण विभागासमोर ‘उत्तरा’साठी बोलावते तेव्हा त्या भेटीचे दुबळे मोल साऱ्यांना कळून चुकते.

कोणा तलवार नावाच्या मध्यस्थाच्या मदतीने पटेलांनी त्यांच्या सत्ताकाळात १११ विमाने घेतली. एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण केले. मात्र त्या साऱ्यात देशाची विमानेच खाली आली. त्यांच्या या व्यवहारात घोटाळा असल्याचा आरोप मोदी सरकारने करून ६ जूनला त्यांच्या चौकशीला आरंभ करण्याचे जाहीर केले आहे. अजित पवार व सुनील तटकरेंवर ७८ हजार कोटींच्या खर्चातून एकही इंच जमीन पाण्याखाली न आणल्याचा आरोप याआधीच झाला आहे व तेही चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. चौकशीला भिऊन नव्हे, तर सामोरे जाऊन सरकारशी लढा देणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची आताच्या काळातील गरज आहे. लोकसभेत महाराष्ट्रातून त्यांच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे. मात्र तसे न करता ‘आम्ही स्वबळावर लढू’ अशा निरर्थक कविता लोकांना व पक्षाला ऐकविणे यात कवित्व असले, तरी शहाणपण मात्र नाही. पवार हे कमालीचे अनुभवी व जाणते राजकारणी आहेत.

पण ते आपल्या अनुयायांच्या व नातेवाइकांच्या हेकेखोरीपुढे हतबल झाले असावेत असेच त्यांचे आताचे दीनवाणेपण आहे. त्यांनी ऐक्याची तयारी करायची आणि कुणा उदयनराजांनी ‘ती नको’ म्हणायचे व तेवढ्यावर पक्षाने ऐक्याकडे पाठ फिरवायची. यात कुणाचा दुबळेपणा उघड होतो? अशावेळी त्यांचे जाणते अनुयायी आणि सल्लागार कुठे असतात? आणि पवार त्यांचे ऐकून ते मनावर तरी केव्हा घेणार? सारे संपल्यावर..? तसे असेल तर त्यांना शुभेच्छाच तेवढ्या द्यायच्या उरतात. लोकसभेत काँग्रेसचे ५२ सदस्य आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी त्या पक्षाला आणखी दोन सदस्यांची गरज आहे. ते त्याला मिळू नये यासाठी तर पवारांच्या चालढकलीचा हा पुरावा नाही?

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी