संपादकीय - शहाणे करून सोडावे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:08 AM2019-11-09T06:08:41+5:302019-11-09T06:09:41+5:30

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत

editorial - Be wise and let go like marathwada university | संपादकीय - शहाणे करून सोडावे...

संपादकीय - शहाणे करून सोडावे...

Next

सत्ताकारणाच्या धुराळ्यात जेव्हा समाजकारणाचा विसर पडतो त्या वेळी राजकीय नेतृत्वाला भानावर आणण्याचे काम बुद्धिवंतांचे असते; परंतु सध्याचा काळ हा तथाकथित बुद्धिवंतांचा आहे आणि त्यांचेही समाजभान हरवलेले असल्यामुळे या तथाकथित बुद्धिवंतांच्या टोळ्याही सत्ताकारणाची समीकरणे सोडविण्यात मश्गूल आहेत. खऱ्या बुद्धिवंतांची प्रभावळ या तथाकथित टोळ्यांनी झाकोळून टाकल्याने प्रसारमाध्यमांनाही त्यांचा विसर पडलेला दिसतो; पण अशा परिस्थितीत वास्तवाची जाणीव लक्षात घेऊन इतरांना उपदेशाचे डोस न पाजता आपल्या कृतीतून सर्वांना संदेश देत वर्तमानाचे भान देण्याचे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने उचलले आहे. गेल्या चार वर्षांचा दुष्काळ आणि या वर्षाचा ओला दुष्काळ या अस्मानी संकटाने मराठवाडा-विदर्भ पिचून गेला आहे.

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत. त्यांच्यासमोर शिकण्यासाठी पैशाचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाकडून पैसा येणार नाही हेच वास्तव आहे. अशाही परिस्थितीत अनेक विद्यार्थी कमवा-शिका योजनेतून काम करीत परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. अगदी विद्यापीठाची फळबाग, उद्यान येथेही निंदणी, खुरपणीची कामे हे विद्यार्थी करतात; पण या वर्षीची परिस्थिती आणखीनच बिकट असल्याने शैक्षणिक शुल्काचे पैसे कोठून भरायचे, अशी मूलभूत समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या वर्षी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाचे स्वागत करीत व्यवस्थापन परिषदेने एकमुखाने त्याला मान्यताही दिली. कुलगुरूंची ही कृती राज्याचा विचार करता छोटी असली तरी मोठा संदेश देणारी आहे. सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारक्षेत्रात काय करू शकतो, काही नाही तरी खारीचा वाटा उचलू शकतो, असा सकारात्मक संदेश देणारी ही त्यांची कृती आहे. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. अगदी तक्षशिला, पाटलीपुत्र अशा प्राचीन विद्यापीठांच्या कामाचा धांडोळा घेतला तर ती जशी ज्ञानाची केंद्रे होती तशी सामाजिक, राजकीय चळवळीचे प्रेरणास्रोतही होते. त्याही पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ऋषिमुनींचे आश्रम म्हणजे ध्यान-धारणा, ईश्वर पूजांचे केंद्र नव्हतेच. मुळात वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम हे प्रयोगशाळाच म्हणता येतील.

 उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात कापसाची लागवड ही फार पूर्वीपासून आहे. वत्सगुल्म नावाचा ऋषी जो की कापूस शास्त्रज्ञ होता. त्याने प्रथम कापसाचा प्रयोग वºहाडात केल्याचे दाखले आहेत. त्याचा आश्रम वाशिम येथे असल्याचे म्हटले जाते. अणूच्या क्षेत्रात कणाद या ऋषीचे नाव घेतले जाते, तर शून्याचा शोध लावणाºया भास्कराचार्य या ऋषींचा आश्रम चाळीसगावजवळच्या पाटणादेवी येथे होता आणि त्याचा गणितातील ‘लीलावती’ हा ग्रंथही महत्त्वाचा मानला जातो. हे पूर्वीचे दाखले आहेत. राजसत्ता चुकत असेल तर तिच्याविरुद्ध वैचारिक आंदोलन उभे करण्याचे काम विद्यापीठातूनच होते. आणीबाणीविरुद्ध पहिले नवनिर्माण आंदोलन गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केले होते. त्यातून पुढे राजकीय चळवळ उभी राहिली. दुसरे आंदोलन जे की, आसाममध्ये परकीय नागरिकांविरुद्ध घडले ते असम गणपरिषदेचे होते; पण ते छेडणारे भृगुकुमार फुकनपासून सगळेच नेते विद्यार्थी होते. जगभराचा विचार केला तर अशी ढीगभर उदाहरणे देता येतील. शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा विद्यापीठाचा निर्णय हा असाच इतरांसाठी दिशादर्शक आहे. ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ या भूमिकेचीच आज जास्त गरज आहे आणि ती या विद्यापीठाने बजावली म्हणून कौतुक़


विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही, तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात.

 

Web Title: editorial - Be wise and let go like marathwada university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.