शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

पाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे.

- सुधीर महाजनपाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे. मराठवाड्यात फाल्गुनातच वैशाख वणवा पेटला आहे. तसा तो तीन वर्षांपासून पेटतोच आहे. पाणी नाही, चारा नाही, सगळीकडे एक भयाण भणंग अवस्था निर्माण झाली आहे. काही गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात. पण या दुष्काळाने मराठवाड्याचा माणूस आता अस्वस्थ होत नाही. निसर्गाच्या माराने तो बधिर झाला आहे. परिस्थितीचे भान, आकलन आहे; पण काही सुचत नाही. वणवा जाळत असला तरी संवेदना चटके बसण्यापलीकडे गेल्या आहेत. फाटक्या आभाळाला ठिगळ लावलं तरी ऊन भाजून काढणार आहे, ठिगळाचा उपयोग नाही.हल्ली दुष्काळाने अन्नान्नदशा होत नाही; तो दाही दिशा फिरवतो. पार मोकळे पडले, जनावरे खपाटी गेली. जो तो पाणी शोधत फिरताना दिसतो. दिवसभर चर्चा पाण्याची आणि वाट पाहायची ती टँकरची. लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. पारावर गप्पांचे फड रंगत नाहीत. सारे मूकपणे शून्यात नजर लावून बसलेले दिसतात. कोणाचा भाऊ तर कोणाचा पोरगा पोट भरायला शहरात गेला. गावात उरली म्हातारीकोतारी माणसं. पाण्याअभावी अवघ्या खेड्यांचा जीवन रसच आटला आहे.मुख्यमंत्र्यांनी लातुरात मंत्र्यांची बैठक घेतली. त्या अगोदर दिवसभर २९ तालुक्यांची पाहणी मंत्र्यांनी केली. घोषणा झाल्या. पाऊस घोषणांचा पडतो. तो लोकानी जेटलींच्या अर्थसंकल्पातही अनुभवला. दुष्काळी अनुदानाची घोषणा कधीच झाली; पण तेसुद्धा पूर्ण मिळणार नाही. तुकड्या तुकड्यांनी तुकडे फेकल्यासारखे. सरकारच्या करणी आणि कथनीतला हा फरक ठळक जाणवतो. आज मराठवाड्यात १५०० टँकर्स पाणी वाटत फिरतात आणि दिवसामागे ही संख्या वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये अवघे साडेसहा टक्के पाणी आहे. अजून मार्च अर्धा जायचा. बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर एक महिन्याच्या पाण्याची वाफ होणार. ४० लाख लोकांना दीड हजार टँकरने पाणी पुरवठा होतो. एप्रिलअखेर मोजकी गावे वगळता सगळीकडे टँकर लागणार. म्हणजे एकदाचा मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला. लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ८७ लाख लोकसंख्या आहे; पण तेवढाच विचार करून चालणार नाही. ५५ लाख जनावरे जगवावी लागतील. माणसांचा विचार केला तरी १३५ लिटर पाणी मिळावे ही अपेक्षा आहे. १,८५००००० बाय १३५ गुणाकार केला, तर रोज किती लिटर पाणी लागणार याचा अंदाज येतो.सध्या लातूर शहराची अवस्था भयानक झाली आहे. महापालिकेने गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठाच केला नाही. कारण पाणीच नाही. मांजरा प्रकल्प कोरडेठाक मैदान बनले. पाण्याची वाहतूक पोलीस बंदोबस्तात करण्याची पाळी आली. येथे पाणी मूल्यवान आणि ज्वालाग्राही बनले आहे. किल्लारीचे पाणी नेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला, रस्ते अडविले. जागोजागी हेच चित्र आहे. लातूर शहरात माणसं दिवसभर पाणी शोधताना दिसतात. हातगाडी, चारचाकी, रिक्षा, दुचाकी, इतकेच नव्हे तर गाढवांचाही वापर पाणी आणण्यासाठी केला जातो. लोकांनी तर रिक्षाच भाड्याने घेतल्या आहेत. लातूरमध्ये तर पाणी बचतीचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात चार लिटर पाण्यात स्वच्छ अंघोळ कशी करता येते याचे प्रशिक्षणच मुलांना देण्यात आले. दुष्काळाची दाहकता अजून काय काय शिकवणार? पाण्याची काटकसर कशी करावी याचे प्रशिक्षण मुलांना देण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. शंभर वर्षापूर्वी चिं. वि. जोशी या महान विनोदी लेखकाने ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ अशी कथा लिहून हसविले होते. लातूरकरांना हा अनुभव येत आहे पण क्षणोक्षणी रडवीत आहे.