शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

अडगळीत गेलेली सायकल पुन्हा रस्त्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 3:34 AM

bicycle : सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झालीय. हा नवा ट्रेंड चकीत करणारा ठरलाय...

- श्रीनिवास नागे(उपवृत्तसंपादक, सांगली)कोरोनानं ‘लाइफस्टाइल’च बदलली राव ! फिटनेसबाबत झपाट्यानं जागरूकता वाढलीय. अडगळीत गेलेली सायकल अचानक रस्त्यावर दिसू लागली. व्यायाम-फिटनेस, पर्यावरण हित, पेट्रोलची बचत याचा विचार पुढं आला आणि लॉकडाऊनमध्ये सायकलचा खप वाढला. देशातल्या सायकलविक्रीत गेल्या सात महिन्यांत दुप्पट वाढ झालीय. बहुतांश शहरांमध्ये मनपसंत सायकल खरेदी करण्यासाठी चक्क ‘वेटिंग’ सुरूय. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदवण्यात आलीय. भारत हा जगातला दुसरा सर्वांत मोठा सायकल उत्पादक देश आहे. सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झालीय. हा नवा ट्रेंड चकीत करणारा ठरलाय...आठवतात ते सायकल शिकण्याचे दिवस. चोवीस किंवा बावीस इंची काळी सायकल असायची. एका पायानं पायडल मारत ढेंग टाकायची आणि बसायचं. तोल सावरत शिकायचं. पडलं की गुडघे सोलून निघायचे... पन्नासच्या दशकात पंधरा-वीस रुपयांना सायकल मिळायची. सायकल म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं ! ती खरेदी करण्यासाठी सरकारी मान्यता लागायची. नगरपालिकेकडून बिल्ला घेऊन सायकल खरेदीला जायचं. तो बिल्ला सायकलला बसवला जायचा. तोच नोंदणी क्रमांक. नंतर सायकली भाड्यानं मिळू लागल्या. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत त्या भाड्यानं मिळायच्या. गल्लीबोळात भाड्यानं सायकली देण्याची दुकानं असायची. शाळा-महाविद्यालयं, शासकीय कार्यालयांबाहेर सायकली लावण्यासाठी थांबे असायचे...चित्र बदललं. वीस-पंचवीस वर्षांत सायकली जाऊन दुचाकी आल्या. चारचाकी वाढल्या. दहावी-बारावीनंतर बक्षीस म्हणून सायकल मिळायची, तिथं पोरं दुचाकी गाड्या मागू लागली. सायकली अडगळीत पडल्या... आणि कोरोनाचं संक्रमण सुरू झालं. पुन्हा सायकल बाहेर पडली. सायकल ते दुचाकी, चारचाकी ते पुन्हा सायकल हे वर्तुळ पूर्ण होतंय... सायकलीनंही कात टाकलीय. मोठ्या कंपन्यांची देखण्या डिझाइन्सची नवनवी मॉडेल्स बाजारात आलीत. ‘जो जिता वही सिकंदर’मधला सायकल रेसचा थरार आठवतो का? गिअरच्या तशा सायकलींची क्रेझ आता आलीय. त्यांच्या किमती चार हजारापासून आठ-नऊ लाखापर्यंत. सायकली फिरवणारी तरुण मंडळी सकाळी रस्त्यांवर दिसायला लागलीत, ते त्यामुळंच. जागतिक आरोग्य संघटनेनं सोशल डिस्टन्सिंग आणि व्यायामाला महत्त्व देण्याच्या दृष्टीनं सायकलचा वापर करावा, असा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे विविध देशांतील अनेक शहरांत सायकल वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय. मिलान, जिनिव्हा, ब्रुसेल्स आणि लंडनसारखी शहरं त्यात आहेत. भारतातही तशा निर्णयांची चाहूल लागलीय. सायकलिंग करणाऱ्यांची मंडळं स्थापन झालीत. ‘सायकल वापरा’ चळवळ जोमानं सुरू झालीय. आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती याबाबत जागरूकता वाढल्यानं व्यायामासाठी सायकलींच्या मागणीत वाढ होतेय. सायकलमुळं शरीराच्या सर्व भागांचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरुस्त राहतं. सायकलिंगमुळे मानसिक आरोग्य जपलं जातं. मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्यानं वाढते. हृदय आणि फुफ्फुस उत्तम राहतं. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो. हे फायदे समजल्यामुळं सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढली नसती तरच नवल! अनलॉकच्या काळात रस्त्यांवरील वाहनांची घटलेली संख्या आणि प्रदूषण कमी झाल्यानं लोकांनी सायकल चालवण्यावर भर दिला. गंमत म्हणजे या कालावधीत बहुतांश लोकांनी पहिल्यांदाच सायकल खरेदी केली! मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळं देशभर एप्रिलमध्ये सायकलची विक्री शून्यावर आली. मेमध्ये मात्र देशात ४ लाख ५६ हजार ८१८ सायकलींची विक्री झाली. जूनमध्ये ती दुपटीनं वाढली. सप्टेंबरमध्ये ती ११ लाख २१ हजार ५४४वर पोहोचली! 

आता तर संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरणविषयक समितीनं सांगितलंय की, सायकलचा वापर केला तर अनेकांचे जीव वाचतील. पर्यावरणही सुरक्षित राहील. त्यामुळं कोरोनाच्या काळात सार्वजनिक परिवहन व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे रुळावर येत नाही, तोपर्यंत दैनंदिन वापराला, कामावर घरापासून ते इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी आणि परत येण्यासाठीही सायकल हा एकमेव साधा, सहज मार्ग दिसतोय. मध्यंतरी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत भाडेतत्त्वावर सायकल योजना सुरू झाली. तिचा विस्तार आता सगळ्याच शहरांत झाला, तर ही सायकलसफर आणखी बहारदार होईल.

टॅग्स :Indiaभारत