धुळ्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:25 AM2020-07-11T09:25:10+5:302020-07-11T09:29:57+5:30

कालिका माता मंदिराजवळील घटना : दुचाकीही नदी पात्रात सापडली

Young man stoned to death in Dhule | धुळ्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

धुळ्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

Next

धुळे : शहरातील कालिका माता मंदिराजवळ जितेंद्र शिवाजी मोरे (३५, रा़ फुले नगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उजेडात आली़ घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले आणि त्यांचे पथक व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ कालिका माता मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळच त्याचा मृतदेह दगडाच्या थारोळ्यात निपचत पडलेला होता़ तर एमएच १९ एडी १४५३ क्रमांकाची दुचाकी नदीपात्रात पोलिसांना तपासाअंती सापडली आहे़ ती त्याचीच आहे की दुसºयाची त्याचा शोध पोलीस घेत आहेत़ सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती़ अनेकांच्या प्राथमिक चौकशीतून ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले़ जितेंद्र मोरे हा गरुड कॉप्लेक्समधील एका कुरियर सेंटरमध्ये कामाला होता़ सायंकाळी उशिरा आलेले पार्सल उतरवून तो घराकडे निघाला होता़ त्याचे मागच्याच वर्षी लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील असल्याचे सांगण्यात आले़ धुळे शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा तपास सुरु आहे़

Web Title: Young man stoned to death in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे