शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जापी शिवारात गळा चिरून तरुणाचा कोयत्याने खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

येथील पावरा सामाजातील केवलसिंग पावरा यांच्याकडे शनिवारी लग्न असल्याने मध्य प्रदेशातील पानसेमल तालुक्यात असलेल्या हटवाडी येथे राहणारा त्यांचा जावई ...

येथील पावरा सामाजातील केवलसिंग पावरा यांच्याकडे शनिवारी लग्न असल्याने मध्य प्रदेशातील पानसेमल तालुक्यात असलेल्या हटवाडी येथे राहणारा त्यांचा जावई काशीराम चिखल बारेला व अन्य नातवाईक लग्नघरी आले होते. शनिवारी लग्न आटोपल्यानंतर रविवारी जावई काशीराम पावरा आपल्या गावी परतही गेला होता. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा तो जापी येथे आला. रात्री केवलसिंग पावरा यांच्याकडे मुक्कामाला होता. याच गावात केवलसिंगचा भाऊ व भाचा राहत असल्याने बुधवारी सकाळी केवलसिंगचा मुलगा व भाचा राजेंद्र रामसिंग बारेला हे घरातून बाहेर पडले असता, त्यांच्या मागोमाग काशीरामही घरातून बाहेर पडला.

केवलसिंगचा भाचा राजेंद बारेला व मुलगा हे दोघे कापडणे पाटचारीजवळून जात असताना अचानक मागावून काशीराम पावरा तेथे आला त्याने विळ्याने राजेंद्रच्या मानेवर व पोटावर वार केला. हा वार वर्मी लागल्याने राजेंद्र लागलीच खाली कोसळला. तर त्यानंतर आरोपीने केवलसिंग यांच्या मुलावरही वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेल्याने बचावला. घटनेनंतर काशीराम पावरा फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि भूषण कोते, उपनिरीक्षक सागर काळे, एलसीबीचे प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस पाटील मनोज गुजर, सरपंच भय्या पाटील आदी याठिकाणी उपस्थित होते. या घटनेने जापी गावात खळबळ उडाली आहे, शिवाय मुख्य संशयित राजेंद्र बारेला याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.