जोयद्यातील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:43 IST2020-09-27T20:43:12+5:302020-09-27T20:43:50+5:30

शिरपूर : तालुक्यातील जोयदा गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दोन मित्र गेले असतांना एकाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना ...

A young man drowned in a lake in Joyadya and both survived | जोयद्यातील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, दोघे बचावले

dhule


शिरपूर : तालुक्यातील जोयदा गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दोन मित्र गेले असतांना एकाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली़ दुसरा मित्र काठावर आल्यामुळे तो बचावला़ दरम्यान, मयताचे प्रेत शुक्रवारी करवंद धरणात तरंगतांना मिळून आले़
२३ रोजी दुपारी २़३० वाजेच्या सुमारास जोयदा येथील २६ वर्षीय विवाहित तरूण गोविंद राणा पावरा व मित्र रणजित पावरा, मनोज ओंकारसिंग पावरा हे तिघे गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते़ दरम्यान, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सरहद्दीवर अरूणावती नदीच्या मुखाशी जोरदार पाऊस होत असल्यामुळे पाणी पातळीत अचानक वाढ झाली़ यात रणजित पावरा व मनोज पावरा हे दोघे पोहून काठावर आले तर त्यांचा मित्र गोविंदा पावरा यास वाढते पाणी व वेगाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेवूनही तपास लागला नाही़ घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २५ रोजी वाहून गेलेला गोविंद राणा पावरा याचे प्रेत करवंद धरणात तरंगतांना दिसून आले. त्यांच्यावर जोयदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: A young man drowned in a lake in Joyadya and both survived