शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढणार तर कांदा, मिरचीचे घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:20 IST

शिंदखेडा तालुका : मालपूर परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, कलवाड,े अक्कलकोस कर्ले परसोळे आदी परिसरातील शेतकरी नवउमेदीने लागवड व पेरणी योग्य क्षेत्र तयार करण्याच्या कामात व्यस्त असुन ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी मालपुर सह परिसरात कापुस लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर कांदा, मिरची पिकाच्या क्षेत्रफळात घट दिसत आहे.येथील बागायती कापुस लागवड पुर्णत्वास आली असून सध्या कोरडवाहू कापसाच्या लागवडी योग्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम देखील अंतिम टप्प्यात आले असुन निसर्ग चक्रीवादळाचा पाऊस येथे आल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पुन्हा नविन वखरणी करुन कापुस लागवडीसाठी सर पाडत आहेत तर काही ठिकाणी त्याच सर मध्ये पुन्हा नव्याने सर पाडत आहे. यामुळे बसलेली सर पुन्हा दुरुस्त होत असुन या मेहनतीमुळे निंदणी चा खर्च वाचणार असल्याचे जाणकार शेतकरी त्यांच्या अनुभवातून सांगतात.मिरचीसाठी दोंडाईचा बाजारपेठ प्रसिद्ध आहे. मात्र दोन वर्षांपासून या मिरची लागवडीच्या क्षेत्रात सतत घट होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड क्षेत्र देखील घटणार आहे. या पिकासाठी भरपूर पाणी लागते. पाणी देखील आहे. मात्र सध्या या पिकाचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता याकडे येथील शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडेही पाठ फिरविली आहे.यावर्षी येथे अमरावती मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची पाण्याची टंचाई दिसुन येत नाही. मागच्या आठवड्यात उजवा व डावा या दोनही कालव्याना पाणी सोडण्यात आल्यामुळे याचा मोठा दिलासा मिळाला.मालपूरसह परिसराचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे. म्हणून सर्व मरगळ झटकून शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.