मालपूर येथे वीर जवानाच्या अस्थिकलशाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:26+5:302021-08-01T04:33:26+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडाजवळील कंळबु गावाचा हा जवान. शहीद निलेश अशोक यांना वीर मरण आले. मणिपूर येथे कर्तव्य बजावताना गोळी ...

Worship of the ossuary of Veer Jawana at Malpur | मालपूर येथे वीर जवानाच्या अस्थिकलशाचे पूजन

मालपूर येथे वीर जवानाच्या अस्थिकलशाचे पूजन

Next

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडाजवळील कंळबु गावाचा हा जवान. शहीद निलेश अशोक यांना वीर मरण आले. मणिपूर येथे कर्तव्य बजावताना गोळी लागल्यामुळे जखमी झाले होते. उपचार सुरू असताना वीरगती प्राप्त झाली. शहीद जवान निलेश याला आई-वडील नसल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथेच लहानपणापासून मामाकडे शिकत होता. लहानाचा मोठा तिथेच झाला. अतिशय गरीब कुटुंबाचा साधारण मुलगा होता. वडील भारतीय सेनेत होते. त्याचे काका BSF जवान १९व्या साली शहीद झाले...दादासाहेब रावल कॉलेज दोंडाईचा येथे शिक्षण व NCC बेस्ट विद्यार्थी होता. NCC मध्ये ३वर्षांच्या नंतर नांदेड येथील सैन्य भरती झाला. खूपच मेहनत, जिद्द, चिकाटी, सराव करून यश प्राप्त केले. मुलांना नेहमी मार्गदर्शन करायचा. खूपच दयाळू स्वभावाचा होता. निलेेेश ऊर्फ बबलूने खूप कष्ट करून दिवस काढले होते. त्यांच्या बालपणाच्या सवंगडीने अनेक आठवणी जागृत केल्या. सामूहिक श्रद्धांजली वाहून अस्थिकलश कंळबूच्या दिशेने रवाना करण्यात आला. यासाठी बाॅर्डर ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Worship of the ossuary of Veer Jawana at Malpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.