शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसदी गणातील ग्रामपंचायतींची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

म्हसदी : ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या म्हसदी प्र नेर गणातील सहा ...

म्हसदी : ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या म्हसदी प्र नेर गणातील सहा ग्रामपंचायतींची कार्यशाळा येथील धनदाई देवी मंदिर परिसरात घेण्यात आली. सरपंच शैलेजा राजेंद्र देवरे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या. १५ व्या वित्त आयोगातून सन २०२१- २०२२मध्ये करावयाच्या विविध विकासकामांचे नियोजन करून त्याला ग्रामपंचायतीची मंजुरी घेऊन १५ मार्चपूर्वी शासनाच्या ग्रामस्वराज्य या संगणकीय प्रणालीवर हा विकास आराखडा तयार करून अपलोड करावयाचा आहे. त्यासाठी म्हसदी प्र नेर गणातील म्हसदीसह राजाबाई शेवाळी, वसमार, काळगाव, ककाणी, चिंचखेडे येथील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य इंदूबाई मल्‍हारी गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, सरपंच शैलेजा देवरे, धनदाई देवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, सचिव महेंद्र देवरे, ककाणीचे सरपंच सचिन बेडसे, राजबाई शेवाळीचे सरपंच नीलेश शिंदे, अक्कलपाडाचे सरपंच श्रीराम कर्वे, म्हसदीचे उपसरपंच चंद्रकांत देवरे, चिंचखेडे सरपंच अभिमन सोनवणे, वसमारच्या सरपंच संगीता नेरे, उपसरपंच विमलबाई काटके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा भामरे, नीलेश शिंदे, मयुरी विसपुते, सरपंच शैलेजा देवरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर अंबावाडी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र देवरे, समाधान देवरे, प्रकाश खैरनार, प्रवीण देवरे, भूषण चव्हाण, सचिन मोहिते, सिद्धार्थ मोहिते यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला म्हसदी गणातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, जिल्हा परिषद मराठी शाळांचे शिक्षक, आदी उपस्थित होते.