कोरोना काळात आमदार फारूक शाह यांचे काम उल्लेखनीय-डॅा. सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST2021-02-27T04:48:16+5:302021-02-27T04:48:16+5:30

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत क्रमांक १ येथे १७ लाख रुपयांच्या निधीतून वाहनतळ दुरुस्ती होणार आहे. ...

The work of MLA Farooq Shah during the Corona period is remarkable-Dr. Traps | कोरोना काळात आमदार फारूक शाह यांचे काम उल्लेखनीय-डॅा. सापळे

कोरोना काळात आमदार फारूक शाह यांचे काम उल्लेखनीय-डॅा. सापळे

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत क्रमांक १ येथे १७ लाख रुपयांच्या निधीतून वाहनतळ दुरुस्ती होणार आहे. हिरे महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णवाहिका आणि शववाहिका तसेच नागरिकांना वाहन तळावर पार्किंग करण्यासाठी गैरसोय होत होती. गैरसोय दूर करण्यासाठी शासनाकडून वाहनतळासाठी दुरुस्ती होणार आहे. या कामाचा शुभारंभ आमदार फारूक शाह यांचे लहान बंधू सलीम अन्वर शाह आणि अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. मुकरम खान, डॉ. ज्योती बागुल, डॉ. अजय सुभेदार, नीलेश काटे, शहराध्यक्ष नुरा शेख, परवेज शाह, अफसर शाह, गफ्फार शाह, राहुल काटे आदिंसह मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोरोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या काळात आमदार फारूक शाह यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे, असेही अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी व्यक्त केले.

Web Title: The work of MLA Farooq Shah during the Corona period is remarkable-Dr. Traps