शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वाळु माफियांविरुध्द कठोर भुमिका घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:47 IST

जिल्हाधिकारी : पत्रकार भिका पाटील हल्ला प्रकरणी प्रशासनाला निवेदन, शिंदखेडा, साक्रीतही निषेध

धुळे : वाळू माफियांविरुध्द प्रशासन कठोर भुमिका घेत आहे. गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र पथक तयार केले असून वाळू माफियांशी लागेबांधे असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचाही शोध घेतला जाईल. पत्रकार भिका पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्हा प्रशासन पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी भुमिका जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मांडली.लोकमतचे शिंदखेडा येथील पत्रकार भिका पाटील यांच्यावर सोमवारी रात्री वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. या घटनेचा पत्रकार सृष्टीसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी पत्रकार सुनील पाटील, धनंजय दिक्षित, राजेंद्र साेनार, दीपक वाघ, तुषार परदेशी, किशाेर पाटील, मनेष मासाेळे, दीपक बाेरसे, नागिंद माेरे, प्रशांत परदेशी, चंद्रकांत साेनार, अजिम शेख, रवींद्र नगराळे, अतुल जाेशी, सुनील बैसाणे, विजय डाेंगरे, शांताराम अहिरे, सुनील महाले,गोरख गर्दे, बापू वाफेकर, राजू कापडणीस, गाेपाल कापडणीस, राजेंद्र गुजराथी यांच्यासह विविध वृत्तपत्र, स्थानिक,राष्ट्रीय चॅनेलचे प्रतिनिधी,फाेटाेग्राफर उपस्थित हाेते.शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळु चोरी होत असून वाळु माफियांचा बंदोबस्त करावा. पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करणारे निवदेन शिंदखेडा येथील पत्रकारांनी तहसिलदारांना दिले. यावेळी प्रा. दीपक माळी, प्रा. अजय बोरदे, विजयसिंह गिरासे, प्रा. जी. पी. शास्त्री, प्रा. सतिष पाटील, अशोक गिरनार, जितेंद्र मेखे, परेश शाह, योगेश बोरसे, धनराज निकम, चंद्रकांत माळी, मनोज गुरव, महेंद्र मराठे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.दरम्यान, साक्री येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष आबा सोनवणे, जी. टी. मोहिते, जगदिश शिंदे, बाळकृष्ण तोरवणे, प्रा. लहू पवार, भानुदास गांगुर्डे, विलास देसले, शरद चव्हाण, रवींद्र देवरे, प्रकाश वाघ, संगपाल मोरे, सुर्यकांत बच्छाव, जितेंद्र जगदाळे, उमाकांत अहिरराव यांनी तहसिलदारांना निवेदन देवून हल्लेखाेरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.तसेच साक्री तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे