शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची बदनामी सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

धुळे : महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्ष पोलिसांना ...

धुळे : महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्ष पोलिसांना बदनाम करुन त्यांचे मनोबल कमकुवत करण्याचे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी समर्पण भावनेने, निस्वार्थपणे जीवाची बाजी लावून मुंबईचे रक्षण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संकटसमयी काँग्रेस पक्ष पोलीस दलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याच्या भावना महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सत्तेच्या लालसेपोटी परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम चालविले आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने सांगितले की, मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट, मुंबईवर झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला, अतिवृष्टीतील नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनासारख्या जागतिक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई आणि मुंबईकरांचे निस्वार्थीपणे रक्षण केले आहे. पोलीस दलाच्या या शौर्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र, विरोधी पक्ष काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेसाठी पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम करीत आहे. पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा शकुनी डाव काँग्रेस पक्ष हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि पोलीस दलाचा नावलौकीक जपण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिष्टमंडळाने दिली.