शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

लाटीपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस ...

निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील तीनही प्रकल्प १०० टक्के भरुन वाहात होते. त्यामुळे शेतकरीही सुखावला होता. म्हणून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत कुठलीही पाणीटंचाई जाणवली नाही. जे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आवर्तन सोडावे लागते, त्याची फारशी गरज भासली नाही. पांझरा नदी पात्रातदेखील मार्च महिन्यापर्यंत ओलावा होता. आता मात्र मे महिन्यात पांझरा नदीकाठावरील सुमारे १४ गावांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सर्वच गावांच्या पाणीपुरवठा विहिरी या पांझरा नदी किनारी असल्यामुळे पांझरा नदीतून सुमारे १०० दलघफू एवढे आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. जेणेकरून ग्रामस्थांना पाणी टंचाई जाणवणार नाही. लाटीपाडा धरणात सुमारे ५०० दलघफू पाणी साठा आजपर्यंत शिल्लक आहे. या साठ्यातून काटदान परिसरात दरवर्षी पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडावे. यामुळे उजव्या कालव्यावरील दिघावे, छाईल, प्रतापपूर, नाडसे, दारखेल, निळगव्हाण, बेहेड, विटाई या सर्वच गावांचा पाणी प्रश्न संपेल. लाटीपाडा धरणातून शिल्लक असलेल्या पाणी साठ्यातून पांझरा नदीपात्रात १०० दलघफू व उजव्या कालव्यातून १००० दलघफू एवढे पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागास सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, धुळे व तहसीलदार, साकी यांनाही देण्यात आल्या आहेत.