शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती ...

आगामी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १५ मार्च रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी हे शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित करण्यात आले होते. तसा दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आज वरीलप्रमाणे पहिले आवर्तन सोडण्यात आले असल्याचे अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले.

हे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. कोणीही कोल्हापुरी बंधारे अथवा शेतात वळवू नये. यासाठी सिंचन विभागाने पथक तयार करून पाण्याची चोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच पाणी चोरी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

हे पाणी उजव्या कालव्यातून जाणार असल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढून विहिरींचा जलस्रोतदेखील वाढणार आहे. यामुळे बागायती कापूस लागवडीसाठी संधी असल्याने अप्रत्यक्षपणे तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तर प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत कालव्यातील पाणी झिरपत असल्याने तेथील शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगाम मात्र लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावेळी प्रकल्पातून पाणी सोडताना विखरणचे सरपंच महेंद्र पवार, खर्दे सरपंच सुरेश पवार, अमरावती मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पीयूष पाटील, विशाल अहिरराव, प्रकल्पाचे कर्मचारी मगन चौधरी, जगन पवार, भुरु गिरासेे आदींसह टंचाईग्रस्त गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

पाणी वाया जाण्याची भीती

उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. कालवा नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची भीती मालपूरकरांनी व्यक्त केली आहे.

असा प्रयोग भरपावसाळ्यात ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यातून विखरण तलाव भरण्यासाठी केला गेला होता. मात्र, तेथे घोटभर पाणी पोहोचले नसल्याचे त्यावेळी दिसून आले..

यासाठी प्रथम कालव्याची दुरुस्ती महत्त्वाची असून एक्स्प्रेस कालवा झाला तरच पाणी विखरण तलावात पोहोचेल. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.