शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पोटचाऱ्या करून नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच ...

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या थंड बस्त्यात गुंडाळलेल्या या योजनेच्या कामाला गती देऊन तापी, बुराई, अमरावती या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास येथील शेतीला बारमाही कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या दरवर्षी हे प्रकल्प भरतीलच याची श्वाश्वती नसल्यामुळे येथील शेतीचे योग्य नियोजन होत नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम होऊन विकास खुंटला आहे.

सन १९८०मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अमरावती मध्यम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी २००६ वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प पूर्ण होऊन पहिल्याच वर्षी पूर्ण क्षमतेने भरला, मात्र त्यानंतर एक तप उलटून गेल्यानंतर १३ वर्षांनी येथील नागरिकांना या प्रकल्पात पाणी पाहायला मिळाले. सध्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून पोटचाऱ्याअभावी येथील पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत आहे.

येथील अमरावती मध्यम प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे असून, अनुक्रमे डावा कालवा सात किलोमीटर व उजवा कालवा एकूण १४ किलोमीटर लांबीचा आहे, मात्र या कालव्यांना लागून प्रत्यक्ष शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी ज्या पोटचाऱ्या पाहिजे त्या अद्याप झालेल्या नाहीत तर काही ठिकाणी अस्तित्वात राहिल्या नसल्याचे चित्र असून, या पाण्याचा उपयोग काही शेतकऱ्यांना घेता येत नसल्याचे वास्तव चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

यामुळे पाणी असून, उपाशी राहण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे, तर या दोन्ही कालव्यांना प्रचंड गळती पहिल्यापासून आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोजचे वाया जात आहे तरी अद्याप याचे कोणाला सोयरसुतक नसून धरण सुरक्षा समितीचे याकडे दुर्लक्ष का होत आहे हा शोधाचा विषय बनला आहे. नुसता प्रोटोकॉल म्हणून पाहणी होत असते. दोन वर्षांपासून अविरतपणे अखंड रात्र-दिवस या पाण्याची नासाडी होत आहे.