शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंजऱ्यांना वृक्षारोपणाची प्रतिक्षाच़़़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 22:50 IST

महापालिका : शेकडो वृक्ष आणि संरक्षण पिंजरे धुळखात पडून, दुर्लक्षतेमुळे पिंजऱ्यांवर चढतोय गंज

धुळे : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत वृक्ष महापालिकेला मिळाली़ त्यासाठी मशिनचा आधार घेऊन खड्डेही खोदण्यात आले़ यंदा समाधानकारक पाऊस सुध्दा झाला़ सर्वकाही आलबेल असतानाही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेकडो वृक्ष लागवडीपासून आजही वंचित आहेत़ तर त्याच वृक्षांसाठी आणलेले लोखंडी जाळीचे पिंजरे अक्षरश: याच महापालिकेच्या एका कोपºयात धुळखात पडून आहेत़ कधी त्या वृक्षांची लागवड होईल आणि हे पिंजरे तिथे लावले जातील हा प्रश्नच आहे़ याकडे पदाधिकाºयांसह अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याचे अधोरेखित होत आहे़शासनाकडून वृक्ष लागवड करण्याची मोहीम पावसाळा सुरु होण्यापुर्वीच राबविण्याचे उद्दिष्ट होते़ त्यानुसार, महापालिकेकडे शेकडो वृक्ष आणि तितकेच पिंजरे देण्यात आले़ त्याचे नियोजन करुन ते धुळेकर नागरिकांना देवून लागवड करण्याचे धोरण आखण्यात आले होते़ मनपाच्या बैठकीत देखील त्यावर काथ्याकूट केल्यानंतर नगरसेवकांच्या माध्यमातून रोपे आणि पिंजरे देण्याचे ठरविण्यात आले होते़ पण, त्याची अद्याप पावेतो अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़पावसाळा संपून चार महिने उलटले आहेत़ तरी देखील महापालिकेच्या आवारात रोपे आणि पिंजरे अक्षरश: पडून आहेत़ रोपे आणि पिंजरे का पडून आहेत, यासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही़ दुसरीकडे मात्र रोपांच्या वाहतुकीवर हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत़ वेळोवेळी हा विषय चर्चेत आला खरा, पण कालांतराने हाच विषय आता दुर्लक्षित झाला आहे़शासनाकडून महापालिकेला सव्वा लाखांच्या आसपास वृक्ष मिळाली होती़ त्यातील बहुतांश वृक्षांचे लागवड करण्यात आले असलेतरी अजूनही बºयाच प्रमाणात वृक्ष पडून आहेत़ त्यांना लागवडीची प्रतिक्षा लागून आहे़ यावर प्रशासन केव्हा निर्णय घेणार आणि त्याची लागवड करणार याकडे नजरा आहेत़रोपांच्या वाहतुकीवर अमाप खर्चमहापालिकेने रोपांच्या वाहतुकीवर अमाप खर्च केला आहे़ विशेष म्हणजे त्या ९ लाखांवरील खर्चाला स्थायी समितीने मंजुरी देखील दिली आहे़ पण, त्याचे पुढे काय झाले? यावर बोलायला सध्यातरी कोणीही पुढे येत नाही़ स्थायी समितीच्या वेळोवेळी बैठका देखील पार पडला़ त्यात वृक्ष लागवडीचे काय? यावर चकार शब्द प्रशासनाकडून निघत नाही की सदस्यांकडून बोलला जात नाही, इतकी उदासीनता आहे़रोपांची केली होती जप्ती, तरीही़़़महाले प्रतिष्ठानने तयार केलेली रोपे महापालिकेने कारवाई करुन जप्त केल्याची मोहिम जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबविली होती़ यातील बरीच रोपे मोठी होती़ पण, सद्यस्थिती पावसाळा संपून तब्बल ४ महिने झाले आहेत़ मात्र, या रोपांचे भाग्य अद्याप उजळलेले नाही़ कधी या रोपांचे भाग्य उजळणार आणि पडून असलेले पिंजरे कधी वाटप होणार? याची उत्सुकता आता धुळेकर नागरिकांना आहे़

टॅग्स :Dhuleधुळे