शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम नाही; तरुणी व महिलांनो न घाबरता लस घ्या : डॉ. मिताली गोलेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे. मासिक पाळीदरम्यान, मासिक ...

कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे. मासिक पाळीदरम्यान, मासिक पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर लस घेतल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तरुणी व महिलांनी अफवांना बळी न पडता लसीकरण करावे, असे आवाहन एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ मिताली गोलेच्छा यांनी केले आहे.

प्रश्न - गरोदरपणात लसीकरण करता येते का?

उत्तर - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही. पण इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनास आलेले नाही. भारतात मात्र गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशातही गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी अजून काही महिने वाट बघावी लागेल.

प्रश्न - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास काय करावे?

उत्तर - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावेत. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये. पण, त्यानंतर दुसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस घेऊ नये.

प्रश्न - प्रसूतीनंतर लस घ्यावी का?

उत्तर - प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करण्याच्या काळात लस घेऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या आहेत. तसेच या विषयावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे याबाबत शासनाच्या नवीन सूचना येईपर्यंत स्तनदा मातांनी लस घेऊ नये.

प्रश्न - मासिक पाळी व लसीकरणाचा एकमेकांवर काही दुष्परिणाम होतो का?

उत्तर - मासिक पाळीत लस घेतल्यानंतर कोणताही दुष्परिणाम होत नाही; तसेच मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. समाजमाध्यमांवर याबाबत चुकीचे संदेश फिरत आहेत. अशा चुकीच्या गोष्टी, अफवांना बळी पडू नये. मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर महिला लस घेऊ शकतात. तसेच पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब आदी आजार असतील तरीही त्या लस घेऊ शकतात.

दोन्ही लसी उपयुक्त

कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत. पण, पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल, त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

लस घेतल्यानंतर बहुतेक रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. काही रुग्णांना सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे अशाप्रकारचा त्रास होऊ शकतो. यामुळे घाबरून जाऊ नये. सकारात्मकता ठेवावी. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लसीकरणामुळे मृत्यू नाही

लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. जागतिक स्तरावर ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे, त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. त्या इतर व्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. ज्येष्ठ नागरिकांसोबतच, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही लस घेणे गरजेचे आहे.