शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोलीत ३५ गायींचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: May 31, 2014 08:03 IST

कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.

शिरसोली : कुर्‍हाडदा रस्त्यावरील काठेवाडी वस्तीतील दोन गोसेवकांच्या ३५ गायींचा तणनाशकाची फवारणी केलेले गवत खाण्यात आल्याने मृत्यू झाला. आणखी १५ गायींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.तणनाशक औषधामुळे मृत्यूशिरसोली परिसरातील कुर्‍हाडदा रस्त्यावर भिमा काठेवाडी, हिरा काठेवाडी, रघुनाथ काठेवाडी यांच्यासह पाच ते सहा जणांची वस्ती आहे. गो-पालन आणि संगोपन हा व्यवसाय असलेल्या भिमा काठेवाडी व रघुनाथ काठेवाडी यांनी मंगळवार २७ रोजी शिरसोली रेल्वे स्टेशन परिसरात गायी चराईसाठी आणल्या होत्या. चराई दरम्यान काही शेतातील तणनाशक औषध फवारणी केलेले गवत या गायींच्या खाण्यात आले. पाणी प्यायल्यानंतर तत्काळ मृत्यूसंध्याकाळी गायींना भिमा काठेवाडी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वाड्यावर आणले. वाड्यावर गायींनी पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने गायी दगावण्यास सुरुवात झाली. पाणी प्यायल्यानंतर पोट फुगून कातडी कोरडी पडायला सुरुवात झाली. एकाच वेळी दहा ते ११ गायी दगावल्यानंतर काठेवाडी कुटुंबात घबराट पसरली. त्यांनी शिरसोली गावात धाव घेत गुरांच्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. डॉक्टरांनी उपचार केले मात्र गायी दगावणे सुरुच होते. बुधवारी भिमा काठेवाडी यांनी महाबळ परिसरातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे धाव घेत उपचारासाठी बोलविले. या दरम्यान गुरांचे दगावणे सुरुच असल्याने डॉक्टरदेखील हतबल झाले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भिमा काठेवाडी यांचे २० आणि रघुनाथ काठेवाडी यांच्या मालकीच्या १५ गायींचा मृत्यू झाला आहे. तर अजून १५ गायी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मृत गायींचा व्हिसेरा पुण्याला रवानामृत झालेल्या ३५ गायींपैकी काही गायींचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. चार्‍यासोबत अतितीव्र स्वरूपाची औषधी पोटात गेल्यामुळे गायींचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी पशुरोग अन्वेशण विभाग प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविला आहे.डॉक्टरांचे पथक तळ ठोकूनगंभीर आजारी असलेल्या गायींवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी डॉ.एन.ई.चोपडे, आर.एस.जाधव, डॉ.गोपाळ सोनवणे, डॉ.बारेला, डी.एम.महाजन, एन.डी.पाटील यांचे पथक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. गंभीर आजारी असलेल्या १५ गायींवर औषधोपचार सुरू आहेत.