शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भूमीगत गटारीचे काम निकृष्ट, रस्त्यांचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:49 IST

शिवसेना : वाडीभोकर रस्त्यावर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी, सत्ताधाऱ्यांवर टीका

धुळे : महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे भूमीगत गटार योजनचे काम करताना देवपूरातील रस्त्यांची पार दुरवस्था झाली असून दोन दिवसात रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर टोकाची भूमिका घेण्याचा ईशारा शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे़शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेतर्फे गुरूवारी दुपारी वाडीभोकर रस्त्यावर खड्ड्यासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी सत्ताधाºयांच्या विरोधात जोरदार घोषबाजी करण्यात आली़शिवसेनेन प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १३३ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामात देवपूरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे़ महापालिकेचे अभियंता या योजनेचे काम करण्यास पात्र नसल्याचे कारण पुढे करुन भाजपच्या नेत्यांनी स्वार्थासाठी सदर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले़ यापोटी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला चार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत़ धुळेकर नागरिकांचा पैसा फीच्या नावाने वाया घालविण्यात येत आहे़कामात वापरलेल्या पाईपचा दर्जा चांगला नाही़ पाईप टाकल्यानंतर खोदकामातून निघालेल्या मटेरियलमधून काही अंशी मऊ मटेरियल पाईपावर टाकायचे़ त्यानंतर १५ सेंटीमीटर मुरूमाचे थर रोलींग करुन रस्त्याचे सपाटीकरण करावे, असे अंदाजपत्रकात नमूद आहे़ परंतु ठेकेदाराने खोदकामाचे संपूर्ण मटेरियल रस्त्यावर टाकल्यामुळे आता पावसाळ्यात माती खचल्यामुळे पाईपची लेव्हल खालीवर झाली आहे़ रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ चिखल साचला आहे़ त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे़ ठेकेदार कोट्यवधी रुपयांचे बिल घेत आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकणासह महानगरपालिका देखील याकडे का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे़ या कामात मोठ्या प्रमाणावर तडजोड होत असल्याचा अरोपही त्यांनी केला आहे़वाडीभोकर रोडसह देवपूरातील रस्त्यांची दोन दिवसात दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाºयांना जागेवर बसु देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, विजय भट्टड, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, जवाहर पाटील, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, पुरूषोत्तम जाधव, पंकज भारस्कर, भरत मोरे, महादू गवळी, ललित माळी, कैलास मराठे, हेमंत बागुल, योगेश पाटील, धीरज तलवारे, सुरेश गवळी आदींनी दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे