रोहयो अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करामी समृद्ध, तर गाव समृद्ध योजना : शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:00+5:302021-03-13T05:05:00+5:30

जिल्ह्यातील रोहयो कामांचा तालुकानिहाय आणि कामनिहाय आढावा घेण्यात आला. नवीन कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे, तपासण्या, तक्रारी, ...

Under Rohyo, ten villages in each taluka will be selected as Karami Samrudh, while Village Samrudh Yojana will provide basic facilities to farmers. | रोहयो अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करामी समृद्ध, तर गाव समृद्ध योजना : शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार

रोहयो अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करामी समृद्ध, तर गाव समृद्ध योजना : शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार

जिल्ह्यातील रोहयो कामांचा तालुकानिहाय आणि कामनिहाय आढावा घेण्यात आला. नवीन कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे, तपासण्या, तक्रारी, जीओ टॅगिंग आदींबाबत सूचना देऊन नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या, अशी माहिती उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करून रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यावेळी यंत्रणेला देण्यात आल्या.

नेमका लाभ काय

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत रोहयोच्या माध्यमातून गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग उभारणे, पशुधन गटांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: Under Rohyo, ten villages in each taluka will be selected as Karami Samrudh, while Village Samrudh Yojana will provide basic facilities to farmers.