नशेच्या गोळ्यांसह चौफुलीवर दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:27 IST2021-03-16T17:27:12+5:302021-03-16T17:27:24+5:30

मध्यरात्रीची घटना : चाळीसगाव रोड पोलीस

The two were caught on the spot with intoxicating pills | नशेच्या गोळ्यांसह चौफुलीवर दोघांना पकडले

नशेच्या गोळ्यांसह चौफुलीवर दोघांना पकडले

धुळे - नशा आणि झोप आणणाऱ्या प्रतिबंधीत औषधी गोळ्यांचा काळाबाजार करणाºया दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून चार बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई चाळीसगाव रोड पोलिसांनी चौफुलीवर सोमवारी मध्यरात्री केली.
सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर एका मोटारसायकलीवरुन दोन जणं एक बॉक्स घेवून संशयास्पदरित्या जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडविले. तपासणी केली असता चार बॉक्समध्ये अल्पारेझोलम आणि अल्पारॅकन ०.५ असे नाव असलेल्या एकूण २ हजार २५० गोळ्या एकूण ५ हजार ४०० रुपये किंमतीचा औषधांचा साठा आणि ४० हजार रुपये किंमतीची एमएच १८ यू ९४५७ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ४५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.
चाळीसगाव रोड पोलिसांनी जमालउद्दीन शेख मुजीबउद्दीन शेख (२१, रा. कुबा मशिदजवळ, धुळे) आणि शेख राहील गुलाम हुसैन (२३, रा. गरीब नवाज नगर, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी आणि तपासणीअंती त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्या विरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे कलम १८ (सी), १८ (ए) चे शिक्षा कलम २७, २८ आणि भादंवि कलम २७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The two were caught on the spot with intoxicating pills