दोन तहसीलदार पाॅझिटिव्ह : उपचार सुरू, तब्येत बरी; अन्य तहसीलदारांकडे पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST2021-03-23T04:38:39+5:302021-03-23T04:38:39+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. यादरम्यान नियोजित लग्न समारंभांची परवानगी मागण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये ...

Two tehsildars tested positive: start treatment, recover; Assignment to other Tehsildars | दोन तहसीलदार पाॅझिटिव्ह : उपचार सुरू, तब्येत बरी; अन्य तहसीलदारांकडे पदभार

दोन तहसीलदार पाॅझिटिव्ह : उपचार सुरू, तब्येत बरी; अन्य तहसीलदारांकडे पदभार

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. यादरम्यान नियोजित लग्न समारंभांची परवानगी मागण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये अभ्यागतांची गर्दी झाली होती. त्यामुळे या तहसीलदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, धुळे शहर अपर तहसील कार्यालयाचा चार्ज संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दिला आहे; तर दोंडाईचा अपर तहसील कार्यालयाचा चार्ज तहसीलदार सुनील सैंदाणे यांना दिला आहे.

जिल्हाधिकारी संजय यादव बरे होऊन सेवेत रुजू झाले आहेत. पुढील दोन आठवडे विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. उपाययोजनांसाठी ते जिल्ह्याचा दाैरा करणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे अधिकारी, कर्मचारी पाॅझिटिव्ह येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. इतरही सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहती आहे. परंतु प्रशासनाकडून त्याची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही.

Web Title: Two tehsildars tested positive: start treatment, recover; Assignment to other Tehsildars