शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळेतील घरफोडी धुळे एलसीबीने केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 17:02 IST

साक्री तालुका : शेतातील झोपडीत चाऱ्याच्या खाली लपवून ठेवलेला लाखांचा मुद्देमाल केला जप्त

धुळे : साक्री तालुक्यातील दिघावे आणि बल्हाणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या चोरीप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. एका संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले ९५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, या चोरी प्रकरणात अजून कोणाचा समावेश आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून समांतर तपास सुरु होता. अशातच साक्री तालुक्यातील कडळी येथील विशाल धनराज भोये याच्याकडे काहीही कामधंदा नाही, तरीही तो मागील एक महिन्यापासून मौजमजा करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्याचा संशयावरुन शोध घेण्यात आला. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्यावर विशाल भोये हा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सापळा लावण्यात आला. त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने साक्री तालुक्यातील दिघावे आणि बल्हाणे येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोलिसांच्या तपासात दिली. तसेच चोरलेला ऐवज हा साक्री तालुक्यातील पापडीपाडा येथील मालकीच्या शेतातील झोपडीमधील चाऱ्याच्याखाली लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी जावून टीव्हीसह संगणक, सीपीयू, प्रिंटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. यात साक्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ९५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, सुनील पाटील, श्रीशैल जाधव, विलास पाटील, दीपक पाटील यांनी कारवाई केली. पकडण्यात आलेल्या संशयितांना साक्री पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Dhuleधुळे