शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांचा लॉकडाउन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 22:20 IST

मनपातर्फे रविवारी रात्री निर्णय जाहीर, शासन आदेशाची अंमलबजावणी कायम, अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी महापालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर १९ प्रभागात २० व २१ एप्रिल असे दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या नवीन अधिसुचनेनुसार सदरचा लॉकडाऊन रात्री मागे घेण्यात आल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली़मालेगाव, साक्री, तसेच जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विविध उपाय-योजना राबविल्या जात आहे़ त्या पार्श्वभुमीवर धुळे शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी तसेच भविष्यात एखादा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्यास खबरदारी म्हणून शहर लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला होता़ त्यासाठी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शहरात लॉकडाउनची अंमलबजावणी होणार होती.रात्री उशिरा शासनाचे निर्देशतथापी शासनाने लॉकडाऊन संदर्भात नवीन सर्वसमावेशक अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामध्ये नमूद केलेल्या भाजीपाला, फळविक्री, मटन, चिकन, मासे विक्री, औषधी विक्री, दूध विक्री अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे़ सदरील निर्देश विचारात घेऊन मनपाकडून लागू केलेला दोन दिवसांचा लॉकडाउन मागे घेतल्याचा निर्णय रात्री ९ वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात आला.अन्य नियम तसेच राहतीलकोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव व नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवळी निर्गमित केलेले व प्रचलित असलेले आदेश व मार्गदर्शक सूचना कायम राहणार आहेत़ त्यास प्रमाणे ३ मे पर्यत लॉकडाउन ठेवण्याचे आदेश ही कायम राहणार आहे़ या कालावधीत नागरिकांनी सोशल डिस्टिन्सिंग, तोंडाला मास्क, रूमाल बांधणे आदीचे पालन करावे असेही आयुक्त अजिज शेख यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे़आस्थापने सुरू राहतीललॉकडाऊनच्या दोन दिवसात शहरातील सर्व दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नव्याने आदेश प्राप्त झाल्याने सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांनी लागू असलेल्या नियमानुसार खरेदी करू शकता़कॉलनीतील सीमा बंदलॉकडाऊनच्या निर्णयामुळे रविवारी सीमा बंद करण्यात आल्या आहेत़ तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य तपासणीलॉकडाऊनच्या कालावधीत मनपा आरोग्य विभागामार्फेत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ त्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून घरोघरी जावून थर्मल यंत्राव्दारे तपासणी केली जाणार आहे़ तपासणी दरम्यान संशयित रूग्ण आढळून आल्यास त्यांची माहिती आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे़तर लॉकडाऊन दरम्यान प्रभागात फवारणी देखील केली जाणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे