शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:41 IST

एलसीबीची कारवाई : मध्यप्रदेशातील दोन मद्यमाफियांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

बोराडी : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी परवानगी नसलेला सव्वादोन लाखांचा दारुसाठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात पकडला़ याप्रकरणी मध्यप्रदेशच्या दोन मद्यमाफियांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मद्यमाफियांच्या मॅनेजरसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़मंगळवारी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमाराला शिरपूर तालुक्यातील मालकातर गावात पोलिसांनी ही कारवाई केली़ मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात पानसेमल मालुक्याच्या मोयदा गावातील रहिवासी गुरमितसिंग दिलिपसिंग वधवा आणि दिलिपसिंग लालसिंग वधवा हे दोघे मध्यप्रदेश राज्यातून देशी, विदेशी दारु खरेदी करुन तिची महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याची परवानगी नसताना देखील ते पानसेमलमार्गे दारुसाठ्याची तस्करी करुन मालकातर गावात व आजुबाजुच्या परिसरात विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती़ त्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकाला छापा मारण्याच्या सूचना दिल्या़त्यानुसार १६ जून रोजी रात्री मालकातर गावात एका मंदिराजवळ पोलिसांनी सापळ रचून एम़ एच़ १८ ए़ ए़ २२३० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची पीकअप गाडी अडविली़ त्यात वेगवेगळ्या कंपनीचा विदेशी दारुचा दोन लाख ३० हजार ४० रुपये किंमतीचा साठा आढळून आला़यावेळी पोलिसांनी वाहनचालक मुकेश जगु पावरा रा़ मालकातर, रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे रा़ मोयदा मध्यप्रदेश या दोघांना पकडले तर भूºया राजाभाऊ पावरा रा़ मालकातर हा फरार झाला़ पोलिसांनी विचारपूस केली असता रमेशसिंग शिवहरे हा मॅनेजर असून गुरमितसिंग वधवा आणि दिलिपसिंग वधवा यांच्या सांगण्याप्रमाणे सदर मद्याची महाराष्ट्रात विक्री करीत असल्याची माहिती समोर आली़याप्रकरणी वाहनचालक मुकेश पावरा रा़ मालकातर, रमेशचंद्र शिवहरे, भुºया राजा पावरा रा़ मालकातर, वाहन मालक दिनेश राणा पावरा रा़ गदडदेव ता़ शिरपूर आणि मद्यसाठ्याचे मालक गुरमितसिंग वधवा, दिलिपसिंग वधवा यांच्याविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई व ६६ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल रफीक पठाण, गौतम सपकाळे, नितीन मोहने, राहुल सानप यांनी ही कारवाई केली़सदरचा मद्यसाठा आणि चार लाख रुपये किमतीचे पीकअप वाहन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे