शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमुक्त शहर करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:33 IST

मनपा आयुक्त अजिज शेख यांनी माहिती

चंद्रकांत साेनार महानगरातील रस्ते, सांडपाण्याची विल्हेवाट व दिवसाआड पिण्याचे पाणी असे प्रश्न सोडविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. भुमिगत गटारीचे काम अठरा महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे धुळेकरांना होणारी अडचण समजू शकतो. आणखी काही महिने त्रास सहन करावा लागू शकतो.  भूमिगत गटारीच्या कामासाठी खराब झालेले ३५ किमीचे रस्ते दुरूस्त केले जाणार आहे. सध्या १० किमीचे रस्ते दुरूस्त केले आहेत. उर्वरीत रस्ते सुध्दा दुरूस्त केले जाणार आहे. तसेच काही रस्ते मनपामार्फत केले जाणार आहे. अशी  माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली.प्रश्न : रस्ते व भुमिगत गटारीसाठी किती निधी प्राप्त झाले आहे. उत्तर :   राज्य नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेले काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. यासाठी १०१. २९ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. यात ७० टक्के राज्य शासन व ३० टक्के मनपा हिस्सा समाविष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ७ किमीचे रस्ते पूर्ण तयार झाले आहेत. तर १५ किमी गटारीचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेमध्ये राज्याचा २३.३९ कोटी तर मनपाचा  ५  कोटी असा एकूण २८. ३९  कोटी निधी प्राप्त आहे. प्रश्न :  रस्ते व गटारीच्या कामासाठी  किती दिवसांची मुदत देण्यात आली होतीउत्तर :  महानगरातील भुमिगत गटार, रस्ते अशा कामांसाठी ठेकेदारास अठरा महिन्याचा कालावधी दिला  होता. या कालावधीत त्यांना हे काम मार्गी लावणे होते. मात्र मध्यतंरी कोरोनाच्या काळात मजूर आपल्या गावी गेल्याने काम बंद पडले. त्यामुळे या कामासाठी विलंब लागला.  साधारण ८ ते १० महिन्याचा कालावधीत काम मार्गी लागले अशी अपेक्षा आहे.प्रश्न :  मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे ?उत्तर :  महानगरातील रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील अनेक वर्षांसाठी पाणीपुरवठा,  ड्रेनेज व रस्ते आदी सुविधांचा लाभ  कायमस्वरूपी होणार आहे.  मनपाच्या अर्थ संकल्पात या पायाभुत सुविधा वाढविण्यासाठी तरतूद केली   आहे.  त्यामुळे येणाऱ्या काळात धुळेकरांचे मुलभुत प्रश्न नक्की सुटतीलमनपाच्या कामांची गुणवत्ता तपासणी होतेमहानगरात सुरू असलेल्या विकास कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र व राज्य शासन मार्फत दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथील संस्थांची त्रयस्त संस्था नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.त्या ठेकेदारांना दिल्या नोटीसाभूमिगत गटार योजनेबाबत काही सदस्यांचा व नागरीकांच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत ठेकेदारांना नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना सुध्दा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वर सांगितल्यानुसार दरमहा बैठक घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बैठकीला आवश्यकतेप्रमाणे नगरसेवकांना सुध्दा बोलविण्यात येते         असल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना  दिली.

टॅग्स :Dhuleधुळे