शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता केले दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST

महाराष्ट्रातील आदिवासी लोकप्रतिनिधीच्या कामावर नाराजी व्यक्त करत आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात जयस, रावण राजे फाउंडेशन, केए ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या ...

महाराष्ट्रातील आदिवासी लोकप्रतिनिधीच्या कामावर नाराजी व्यक्त करत आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात जयस, रावण राजे फाउंडेशन, केए ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घरावर आदिवासी जनाधिकार उलगुलान केले़ दरम्यान, या तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या सुळे येथील निवासी विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले़

आदिवासी समाजाच्या नावाखाली व आरक्षणाखाली निवडून आलेले २५ आमदार व ४ खासदार हे आदिवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत़ लोकप्रतिनिधी असल्यामुळे आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ हे फक्त त्यांच्या पक्षाचे गुलाम झालेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व त्यांनी आदिवासींसाठी काय केले, यासंदर्भात जाब विचारण्यासाठी व आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात २२ जूनपासून आदिवासी जनाधिकार उलगुलान यात्रा सुरू करण्यात आली आहे़

आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय राज्यघटनेत आदिवासींसाठी राजकीय आरक्षण दिले गेले आहे. त्या आरक्षणातून आज आदिवासींच्या राखीव मतदारसंघातून आदिवासी लोकप्रतिनिधी निवडून जातात म्हणून अपेक्षित आहेत़ लोकसभेत व विधानसभेत जाऊन आदिवासींविरोधात घेतलेल्या निर्णयाच्या, आदिवासींवर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात आदिवासी आमदार-खासदार बोलायला पाहिजेत, मात्र तसे दिसत नाही. आदिवासींच्या राखीव जागा गैरआदिवासींनी बळकावलेल्या आहेत़ त्याविरोधात आदिवासी लोकप्रतिनिधी गप्प आहेत़ आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात टीआरटीआयमध्ये आदिवासींच्या हक्काचे १५० कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झाले आहेत़ त्या विरोधात विधानसभेत गैरआदिवासी आमदार आवाज उठवतात. मात्र, आदिवासी आमदार मुंबईला जाऊन पाव-वडा खाण्यात व्यस्त आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

आदिवासी समाजाच्या मुलींवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्याविरोधात आदिवासी आमदार गप्प बसतात, तर मग आदिवासी लोकप्रतिनिधी कशासाठी? आदिवासींच्या विकास कामाव्यतिरिक्त आदिवासींच्या संविधानिक हक्काचे जतन करणे, आदिवासींवर होणा-या अन्याय -अत्याचाराविरोधात आवाज उठवणे, लोकप्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत़ त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांना विविध आदिवासी संघटनांमार्फत हजारो निवेदने देऊनही कुठल्याही निवेदनाचा विचार केला गेला नाही़ सरकारकडून कुठलीही आदिवासींची समस्या सुटलेली नसल्याने महाराष्ट्र राज्यातील तमाम आदिवासी समाज नाराज झाल्याने व आदिवासी समाजाच्या नावाखाली व आरक्षणाखाली निवडून आलेले २५ आमदार व ४ खासदार हे आदिवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत़ लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी जनाधिकार (रथयात्रेचे) उलगुलानतर्फे राज्यभर काढण्यात येत आहे़

१६ जुलै २०१७ च्या सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करून तत्काळ बोगसांनी बळकावलेल्या जागी ख-या आदिवासींची विशेष नोकरपदभरती तत्काळ राबविण्यात येऊन आदिवासी तरुणांची वाढलेली बेरोजगारी दूर करण्यात यावी. पदोन्नती आरक्षणविरोधी आदेश तत्काळ मागे घेऊन पूर्ववत करण्यात यावा. धनगर जात व आदिवासी जमात यांचे सर्वेक्षण करून तो अहवाल सरकारकडे सादर केला आहे़ तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अहवाल सरकारने जाहीर करावा. अनुसूचित जमाती संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अभिछात्रवृत्ती देण्यात यावी. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील १५० कोटींच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी़ महाराष्ट्रातील अकृषक महाविद्यालयातील प्राध्यापकपदाची भरती तत्काळ सुरू करण्यात यावी. प्राध्यापक भरतीसाठी १०० बिंदूनामावली विभागवार आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे. महिलांसाठी दिशा शक्ती कायदा मंजूर केला आहे़ महाविकास आघाडी सरकारने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. आदिवासी क्षेत्रात धान, नाचणी, वरई लागवड कामाचा रोहयो (रोजगार हमी योजना) समावेश करावा. आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी करून प्रत्येक विभागातील पदे भरण्यासाठी पदभरती करून पेसाच्या जागा भराव्यात. खावटी अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे तसेच किराणा स्वरूपात देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत़

आदिवासींच्या समस्या लोकप्रतिनिधींकडून सुटायला पाहिजे होत्या़ त्या समस्या सोडविण्यात आल्या नसल्याने आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम आदिवासींच्या आरक्षित जागेवर आणि त्या सर्टिफिकेटच्या नावावर निवडून आलेले आहेत़ त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळून समाजाच्या समस्या तत्काळ मुख्यमंत्र्यांमार्फत सोडविण्यात याव्यात़ तसे न झाल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात व विधानसभेत मुद्दे उपस्थित करावे आणि आपल्या स्तरावर कार्यवाही करावी. जर आदिवासींच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही, तर पुढच्या अधिवेशनात या सर्व २५ आमदार व ४ खासदार यांचे राजीनामे घेण्यासाठी उलगुलान महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे़