गुरांची निर्दयपणे वाहतूक; ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:30 IST2019-04-03T22:29:32+5:302019-04-03T22:30:15+5:30

तालुका पोलीस : जुनवणे येथे कारवाई

Trafficking of cattle; The truck seized | गुरांची निर्दयपणे वाहतूक; ट्रक पकडला

dhule

धुळे : तालुक्यातील जुनवणे येथे गुरांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक करणारा ट्रक तालुका पोलिसांनी पकडला. त्यातील लहान-मोठ्या २० गुरांची सुटका करण्यात आली. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. गुरांसह ट्रक असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील जुनवणे येथे संशयित ट्रक अडविण्यात आला. त्याची तपासणी केली असता त्यात ११ गाई व नऊ वासरे अशा एकूण २० गुरांना निर्दयपणे कोंबून त्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Trafficking of cattle; The truck seized

टॅग्स :Dhuleधुळे