शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बाजार समिती बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:55 IST

भाजीपाला टंचाईची शक्यता : कांदा, धान्य, भाजीपाला पडून, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गुरूवारपासून अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात धुळे शहराला भाजीपाल्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच शेतकºयांसह व्यापाºयांचे नुकसान टाळण्यासाठी गुरूवारपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दिली़कोरोना विषाणूची भिती असली तरी शेतकºयांच्या शेतीमालाचे नुकसान होवू नये यासाठी बाजार समिती सुरू होती़ सोमवारी कांद्याची तब्बल १५ हजार गोण्या, पन्नास ते साठ ट्रक मोठ्या प्रमाणात आवक झाली़ परंतु कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी ट्रकचालक अव्वाच्या सव्वा दर मागत आहेत़ त्यामुळे कांद्याचा तब्बल दहा ट्रक माल पडून आहे़ तसेच भाजीपाल्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात आहे़ परंतु पोलिस प्रशासनाने दुचाकी वाहने बंद केल्याने तसेच तहसिलदारांसह महानगरपालिकेने देखील भाजीपाला विक्रेत्यांना पास देणे बंद केल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांचा माल पडून आहे़ ढोबळी मिरची फेकण्याची वेळ आली तर इतर भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाला़ धान्याची आवकही आहे़ परंतु व्यापाºयांनी खरेदी केलेला माल बाहेर जाणे बंद असल्याने धान्याचा मोठा साठा पडून आहे़ अशा परिस्थितीत शेतकºयांसह व्यापाºयांचे देखील नुकसान होत आहे़ हमाल मापाडी बांधवांना देखील काम मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत काळासाठी बद करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला, अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली़बाजार समिती बंद राहणार असल्याने कडधान्यासह सर्वच वस्तुंची आवक बंद होईल़ परंतु भाजीपाल्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो़ कारण भाजीपाल्याची आवक बंद झाली तर किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला मिळणार नाही आणि घरपोच भाजीपाला मिळणे देखील बंद होईल़ या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागू शकते़

टॅग्स :Dhuleधुळे