शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सपोनिसह तीन पोलिसांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 21:58 IST

मोहन मराठे मृत्यू प्रकरण : तीन पोलिसांना अटक, पंजाबराव राठोड फरार

दोंडाईचा : येथील मोहन मराठे या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह तीन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला़ तिघा पोलिसांना सीआयडीने अटक केली असून पंजाबराव राठोड हे फरार झाले आहेत़तांदुळ चोरी प्रकरणात मोहन मराठे (३७) या तरुणाला दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी शहादा रस्त्यावर त्याचा मृतदेह हा संशयास्पद आढळून आला होता़ मृत मोहनच्या नातलगांनी त्याचे शवविच्छेदन हे दोंडाईचा येथे न करता धुळ्यात करण्याची मागणी केल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी होकार दर्शविला़ ८ आॅक्टोबर रोजी इन कॅमेरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ तपास हा निपक्ष व्हावा यासाठी प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले़ सीआयडीचे उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली़ शवविच्छेदन अहवाल, घेण्यात आलेले जाबजबाब लक्षात घेऊन पोलीस दोषी आढळून आले़गुन्ह्याची कबुली देण्यासाठी मोहन मराठे याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. फौजदारी कट रचून पुरावा नष्ट करण्याचा वाईट हेतूने मयतास शहादा रस्त्यावर पिरबल्ली जवळ रस्त्यावर अपघात असल्याचे दाखविण्यासाठी टाकून देणे, मानवी शवाची अप्रतिष्ठा करणे, मयतास ताब्यात दिल्याचे खोटे पुरावे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे, गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना न देणे असे काही महत्वाचे आरोप लावण्यात आले आहेत़ याप्रकरणी संशयित सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल नंदलाल सोनवणे यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ३४८, २०१, २०२, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास नंदुरबार सीआयडीचे उपअधीक्षक राजेंद्र भावसार करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे