शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

कँटीनमध्ये शिरलेल्या चोरट्याला रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:57 IST

हा प्रकार सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडला.

धुळे : शहरातील मुख्य बसस्थानकातील कँटीनमध्ये चोरी करून पळणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडला. कँटीनचे छत तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केल्याचे तपासणीतून समोर आले. बसस्थानकातील कँटीन आशिष कायस्थ यांनी चालविण्यास घेतली आहे. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास कँटीनच्या वर चढून सिमेंटचा पत्रा तोडून विनोद राजेंद्र पाटील (वय २४, रा. महेश्वर कॉलनी, चितोड रोड, धुळे) हा संशयित तरुण खाली उडी मारुन आतमध्ये शिरला. चोरट्याने सुरुवातीला नाश्ता केला. चॉकलेटच्या बॉक्समधून चाॅकलेट खाल्ले. नंतर आतमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. डीव्हीआर, एलसीडी टीव्ही, गल्ल्यातील १५ हजार रुपये रोख घेवून तो बाहेर पडला. बसस्थानकातील दोन स्पिकर तोडून ते सुध्दा त्याने चोरुन घेतले. ही चोरी करुन तो पळून जाण्याच्या तयारीत असताना बसस्थानकातील पोलीस चौकीतील पोलिसांना तो चोरटा दिसला. त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले. एक ते दीड वर्षांपूर्वी याच संशयित विनोद पाटील याने अशाच प्रकारची चोरी केल्याचे समोर आले आहे. तेव्हा कुटुंबीयांनी विनवण्या केल्याने तो सुटला होता. पुन्हा चोरी करताना रंगेहाथ सापडला आहे. चोरट्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :Dhuleधुळे