शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही तासात चोरटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 22:04 IST

गरुडबागेतील साडेसात लाखांची चोरी : शहर गोपनीय शाखेची कामगिरी, अल्पवयीन मुलाच्या मदतीने मारला होता डल्ला

धुळे : शहरातील गरुडबाग येथे घरफोडीची घटना घडल्यानंतर एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड करण्यास शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेला यश मिळाले. चोरट्याला देवपुरातील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चोरीला गेलेले सात लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिनेदेखील हस्तगत करण्यात पोलिसांना अवघ्या पाच तासात यश आले.शहरातील गरुडबाग येथे राहणारे चंद्रजित उदय सिसोदे यांच्या ह्यशुभम करोतीह्ण घराचे दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने १५ तोळे वजनाचे सात लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेने तपासाची चक्रे फिरविली. संशयावरून एका अल्पवयीन विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याला त्याच्या पालकाच्या मदतीने विश्वासात घेऊन चौकशी केली. देवपुरातील रमाबाई आंबेडकर नगरात राहणाऱ्या गणेश अनिल मरसाळे याच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. माहिती मिळताच गणेश मरसाळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १५ तोळे वजनाचे सात लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. संशयित गणेश मरसाळे याला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन बालकाचे समुपदेशन आणि त्याचे पुनर्वसन करण्याबाबत पोलीस निरीक्षक यांना सूचना देण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, कर्मचारी भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, योेगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवि गिरासे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल पाटील, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे यांनी ही कारवाई केली.कुत्रा घेण्याच्या मोहापायी एका अल्पवयीन मुलाने गुन्हेगारीचा मार्ग पकडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली़ केवळ एका कुत्र्यासाठी गरुड बागेत घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केला़ हा ऐवज त्याने रमाबाई आंबेडकर नगरातील त्याच्या साथीदाराला दिला़ पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या पाच तासात या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले़

टॅग्स :Dhuleधुळे